Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : भावेश भिंडेवरून राम कदमांचा उद्धव ठाकरेंवर आरोप, मात्र भुजबळांनीच केला बचाव, म्हणाले...

Ram Kadam Vs Uddhav Thackeray भाजप आमदार राम कदम, किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रया, जाणून घ्या काय म्हणाले

Mayur Ratnaparkhe

Ghatkopar Hoarding Accident : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं सोमवारी मुंबईला जोरदार तडाखा दिला. यामध्ये अनेक ठिकाणी नुकासानीच्या घटना घडल्या मात्र सर्वात मोठी दुर्घटना ही घाटकोपरमध्ये घडली. या ठिकाणी दुपारी चार वाजता वादळामुळे एका पेट्रोल पंपावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. त्याखाली शंभराहून अधिकजण दबले गेले, ज्यातील 14 जणांचा मृत्यू झाला. तर उर्वरीत जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आणि अवैध होर्डिंग्जचा मुद्दा समोर आला. शिवाय राजकीय आरोप-प्रत्योरपही सुरू झाले.

याप्रकरणी आता भाजपा आमदार राम कदम(Ram kadam) यांनी संबंधित पेट्रोल पंपाचा मालक भावेश भिंडे याचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो ट्वीट केला आहे. तसेच, भाजप नेते किरीट सोमय्यांनीही मुंबई महापालिकेच्या कारभारावरून उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीच उद्धव ठाकरेंची बाजू घेतल्याचे दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात आमचं सरकार आहे, मुंबई महापालिकाही प्रशासकाच्या ताब्यात आहे. मग या सगळ्याशी उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असा उलट प्रश्न भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. छगन भुजबळ म्हणाले, या सगळ्यात उद्धव ठाकरेंचा काय संबंध? अनेकजण आमच्याकडे पुष्पगुच्छ घेऊन येत असतात ज्यामध्ये व्यापारी, धंदेवाईकांचाही समावेश असतो. आमच्यासोबत फोटोही काढतात. तो व्यक्ती आपला कार्यकर्ता आहे की नाही हेही आम्हाला लक्षात येत नाही. शिवाय फोटोलाही नकार देता येत नाही. त्यामुळे याप्रकरणात लगेच भावेश भिंडेंचा उद्धव ठाकरेंशी संबंध जोडणे किंवा तसा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

याशिवाय याप्रकऱणी कोणीही राजकारण करू नये, तो पेट्रोल पंप कुणाचाही असला आणि तो व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याल शिक्षा झालीच पाहिजे, असंही छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी यावेळी बोलून दाखवलं.

राम कदम काय म्हणाले? -

'14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे.. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात.. मनाला चीड आणणारे हे चित्र.. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते. हे या चित्रावरून स्पष्ट होते.. टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर.. कफनचोर.. आजही टक्केवारी साठी 14 लोकांचे नाहक बळी घेता आहेत.. कुठे फेडणार हे पाप..?'

पोलीस भावेश भिडेला शोधत आहेत.. उगाच इकडे तिकडे फिरून ऊर्जा वाया नका घालवू आमच्या मुंबई पोलिसांची उबाठा नेत्यांच्या घरी बघा.. लगेच सापडेल.. त्यांच्याच मेहेरबानीने टक्केवारी घेऊन होर्डिंग लावले होते त्यांनी टक्केवारीचा पण हिशोब घ्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT