Ram Shinde Vs Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ram Shinde VS Rohit Pawar : रोहित पवारांवर राम शिदेंचा पलटवार, पासपोर्ट प्रकरणात धक्कादायक खुलासा; म्हणाले, 'घायवळच्या मामानेच...'

Nilesh Ghaywal Ram Shinde : निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणात रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना राम शिंदेंनी उत्तर दिले आहे. त्यांनी थेट घायवळच्या मामाचा उल्लेख करत पवारांवर निशाणा साधला

Roshan More

Ram Shinde News : काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनीच राम शिंदे आणि निलेश घायवळ यांचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच घायवळसोबतचे राम शिंदे यांचे फोटो शेअर केले होते. तसेच राम शिंदे यांनीच घायवळला परदेशात पळून जाण्यास मदत केली, असा दावा केला होता.त्याला राम शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, 'रोहित पवार धादांत खोटे बोलले आहेत. माझ्यावर बिनबुडाचे आरोप आहेत. निलेश घायवळला पासपोर्ट कसा मिळाला हे त्याच्या मामाने सांगितलं आहे की, रोहित पवारांनी त्यांना सहकार्य केलं आणि तत्कालीन गृहमंत्र्यानी पासपोर्ट मिळवून दिला.'

त्यांनी माझ्यावर आरोप केले मी त्यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपाची चौकशी मुख्यमंत्री करत आहेत. सत्य काय आहे ते चौकशीतून निष्पण होईल, असे देखील त्यांनी सांगितले.

निलेश घायवळला पासपोर्ट 2020 साली मिळाला. तो पासपोर्ट रोहित पवार यांनीच अनिल देशमुखांच्या माध्यमातून मिळवून दिला. महाविकास आघाडीच्या काळात हा पासपोर्ट देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी रोहित पवारांनीच निलेश घायवळला कर्जत-जामखेड मतदारसंघात आणले आणि प्रचारात उतरवले. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.रोहित पवार यांचे आणि निलेश घायवळ यांचे कौटुंबिक संबंध आहेत.

रोहित पवारांचे उत्तर

राम शिंदे यांनी 2020 मध्ये घायवळला रोहित पवारांच्या मदतीने पासपोर्ट मिळाला, या आरोपावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राम शिंदे सरांनी कदाचित अहिल्यानगर एसपी सहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते त्यांनी नक्की बघावे. पासपोर्ट 2020 साली मिळाला तेंव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं याचा विसर पडला का? आता प्रकरण अंगलट आल्याने गोल गोल फिरवण्यापेक्षा घायवळने तुमचा प्रचार केला की नाही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT