Ram Sutar Passes Away sarkarnama
महाराष्ट्र

Ram Sutar : महाराष्ट्र भूषण, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन

Maharashtra Bhushan Sculptor Ram Sutar : मध्यरात्री एकच्या सुमारास राम सुतार यांचे निधन झाले. नोएडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Roshan More

Ram Sutar News : प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे दिल्लीतील त्यांच्या निवास्थानी मध्यरात्री एकच सुमारास निधन झाले. त्यांनी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली होती. त्यांना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या मृतदेहावर आज सकाळी 11 वाजता नोएडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

धुळे जिल्ह्यातील कोंदूर हे त्यांचे मूळ गाव. मुंबईतील जेजे स्कुल ऑफ आर्टमधून त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण घेतले. तेथून ते केंद्र सरकारमध्ये रूजू झाले. मात्र,नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. त्यांनी राजीनामा देत पूर्ण वेळ शिल्पकलेसाठी स्वत:ला वाहून घेतले.

देशाला स्वतंत्र झाल्यानंतर संसद आणि राष्ट्रपती भवनातील इंग्रजकाळातील शिल्प काढून तेथे भारतीय शिल्प बसवण्याचे पहिले काम राम सुतार यांच्या हाती आले. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ते काम केले.

सर्वात मोठ्या भाकर नांगल धरणार जो मोठा देवीचा पुतळा उभा आहे तो देखील त्यांनी साकारला आहे. जगातील 50 हून अधिक भव्य दिव्य शिल्प त्यांनी उभारली. संसदेच्या आवारात महात्मा गांधींजींची मुर्ती आहे ती देखील त्यांनीच साकारली आहे. जगातली प्रमुख ठिकाणी असलेल्या महात्मा गांधींची शिल्प ही त्यांनीच साकारली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT