Manikrao Kokate Resign : अजित पवारांना मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्र्याचा राजीनामा; अटकही निश्चित

Manikrao Kokate Ajit Pawa : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.
Manikrao-Kokate-Ajit-Pawar
Manikrao-Kokate-Ajit-PawarSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सदनिका घोटाळ्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा दिला तो राज्यपालांनी स्वीकारला. कोकाटे यांच्या कडील क्रीडा खात्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.

कोकाटे यांना झालेल्या शिक्षेनंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना तेथे दिलासा मिळाला नाही. हायकोर्टाने देखील त्यांना दिलास न देता या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर कोकाटेंच्या विरुद्ध अटक वाॅरंट जारी करण्यात आले होते. सुरुवातील कोकाटे यांच्याकडील सर्व मंत्रि‍पदाचा भार काढून घेण्यात आला होता. मात्र वाढता दबाव पाहता त्यांनी थेट राजीनामा दिला आहे.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षांच्या शिक्षेनंतर कोकाटे यांची आमदारकी देखील रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोर्टाचा निकाल मिळाल्यानंतर या विषयी विधीमंडळ सचिवालय निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

Manikrao-Kokate-Ajit-Pawar
Dhananjay Munde News : सुरेश धस यांनी दिल्लीत जाऊन चावी फिरवली; धनंजय मुंडेंची 15 दिवसांतच शहांच्या दरबारात हजेरी!

कोकाटे रुग्णालयात दाखल

नाशिकच्या कोर्टाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यांना कधीही अटक होऊ शकते. दरम्यान, बुधवारी घडलेल्या या घडामोडीमुळे कोकाटे यांची तब्येत खालावली त्यांना तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Manikrao-Kokate-Ajit-Pawar
Thane Election : आपल्याला शिवसेनेची काय गरज? ठाणे भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; युतीची कुणकुण लागताच कार्यकर्ते आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com