Dhananjay Munde News : सुरेश धस यांनी दिल्लीत जाऊन चावी फिरवली; धनंजय मुंडेंची 15 दिवसांतच शहांच्या दरबारात हजेरी!

Delhi political developments News : राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे कोर्टाच्या निकालाने अडचणीत आलेले असताना धनंजय मुंडे यांची शहांसोबत झालेली भेट विशेष समजली जात आहे.
Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg
Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpgSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : पंधरा दिवसांपुर्वी 3 डिसेंबरला भाजप आमदार सुरेश धस यांनी अचानक दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधामुळे संशयाच्या घेरात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी शहांच्या दरबारात हजेरी लावली.

राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे कोर्टाच्या निकालाने अडचणीत आलेले असताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची शहांसोबत झालेली भेट विशेष समजली जात आहे. विशेष म्हणजे पंधरादिवसांपुर्वी सुरेश धस यांनी ज्या कारणांसाठी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगितले होते, तेच परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबतची विनंती करण्यासाठी आपण भेट घेतल्याचे कारण धनंजय मुंडे यांनीही दिले आहे.

Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg
BJP Candidate List : पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, भाजपची उमेदवार यादी फायनल; इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात!

या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती, असे स्पष्टीकरण मुंडे यांच्यावतीने देण्यात आले आहे. भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीतून अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणात प्रचंड आक्रमक झाले होते.

Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg
BJP Vs Shivsena : भाजप आमदाराने दिला फक्त 17 जागांचा प्रस्ताव : चिडलेल्या शिवसेना मंत्र्याकडून एक घाव दोन तुकडे!

बीडमधील कायदा व सुव्यवस्था, दहशत, गुंडागर्दी या सगळ्या मुद्यांवरून धस यांनी धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड असलेल्या वाल्मिक कराड याला टारगेट केले होते. वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माईंड, आका असल्याचे धस यांनी ठणकावून सांगत न्याय मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला होता. वाल्मिक कराड यांच्याभोवतीचा फास आवळतानाच त्याचा आका म्हणून ज्यांच्यावर आरोप आहे त्या धनंजय मुंडे यांच्यावरही डीपीडीसीतील निधीतील भ्रष्टाचार, कृषी खात्यातील औषधी आणि यंत्र सामुग्री खरेदीतील घोटाळा अशी प्रकरण बाहेर काढत धस यांनी रान पेटवले होते.

Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg
NCP Politics : महापालिकेपूर्वीच महायुतीत तणाव? दादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळावर नारा

या सगळ्याचा परिणाम धनंजय मुंडे यांना मंत्री पदाचा राजीनामा देण्यात झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन कृषीमंत्री यांच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचे प्रकरण जेव्हा समोर आले आणि त्यांची मंत्रीमंडळातून हाकलपट्टीची मागणी झाली तेव्हा धनंजय मुंडे यांच्या मंत्रीमंडळातील वापसीची चर्चाही सुरू झाली होती. परंतु तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी छगन भुजबळ यांना मंत्री करत धनंजय मुंडे यांना बाहेरच ठेवण्याची खेळी केली होती. आता बोगस कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याच्या आरोपात नाशिक न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे पुन्हा माणिक कोकाटे यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg
Nashik Teacher Constituency : काँग्रेसचा बडा नेता ठाकरेंच्या गळाला, नाशिक शिक्षक मतदारसंघातून गुळवे मैदानात उतरणार?

मंत्रिमंडळात समावेशाची चर्चा अन् शहा भेट कनेक्शन?

सुरेश धस यांनी पंधरा दिवसापुर्वी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली तेव्हा धनंजय मुंडे यांच्या कारनाम्या संदर्भात चावी फिरवल्याची चर्चा आहे. सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शौर्य पाटील या मराठी विद्यार्थ्याची आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ही योगायोगाने काल दिल्लीतच होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलनाचा इशारा देतानाच त्यांनी शौर्य पाटीलच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या शाळा व तेथील शिक्षकांवर कारवाईची मागणी करत अमित शहा यांच्यावरही टीका केली होती.

Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg
Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

या शिवाय धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरूनही जरांगे पाटील सातत्याने देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. जरांगे यांचे दिल्लीत असणे, काँग्रेस आघाडीच्या महाराष्ट्रातील खासदारांनी परळीतील व्यापारी महादेव मुंडे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी करत अमित शहांची भेट घेणे हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर कोणाला मंत्री करायचे? याची विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडे केल्याचे समजते. अशावेळी धनंजय मुंडे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणे याचे मंत्रिमंडळातील वापसीशी काही कनेक्शन आहे का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg
BJP Candidate List : पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, भाजपची उमेदवार यादी फायनल; इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात!

गाॅगल घालून भेट..

धनंजय मुंडे यांच्या गाॅगलची चर्चा मराठवाड्यात आणि राज्यात मध्यंतरीच्या काळात खूप झाली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देत मुंडे यांनी आवडला असेल तर घेऊन टाका म्हणत पलटवार केला होता. आज अमित शहा यांच्या भेटीतही धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर काळा गाॅगल होता. नेमकं काय लपवण्यासाठी मुंडे यांची हा गाॅगल घातला होता? असा प्रश्नही आता त्यांचे विरोधक उपस्थितीत करत आहेत. धनंजय मुंडे यांनी शहा यांच्यासोबतच्या भेटीचे जे फोटो त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत, ते ही बरेच बोलके आहेत. अमित शहा यांच्या चेहऱ्यावर मुंडे यांच्या भेटीबद्दल कुठलेही सकारात्मक हावभाव दिसत नाहीत. त्यामुळे ही भेट मंत्रिमंडळातील वापसीसाठीची होती, की मग धस यांनी फिरवलेल्या चावीनंतर खुलाशासाठी होती? हे लवकरच स्पष्ट होईल.

Dhananjay Munde Amit Shah Manikrao Kokate .jpg
BJP MLAs dispute : महामंत्र्यांनी वाभाडे काढताच भाजपच्या 4 आमदारांनी वाद मिटवला? पहिल्यांदाच एकत्र एका टेबलवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com