Chandrakant Patil, Ramdas Athavle  Sarakarnama
महाराष्ट्र

Ramdas Athwale News : आठवलेंना टाळत चंद्रकांतदादा आंबेडकरांच्या कार्यक्रमाला; रिपाई कार्यकर्त्यांचा संताप

Political News : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमासाठी उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित केले होते. मात्र, या कार्यक्रमाला ते हजर न राहता आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : महायुतीमधील छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप केला जात असताना आता आणखी एक नवा वाद समोर आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका कार्यक्रमासाठी उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित केले होते. मात्र, या कार्यक्रमाला ते हजर न राहता आनंदराज आंबेडकर यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मैत्रिधर्म, युतिधर्म मोडला असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी स्टेजवरच तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येत्या काळात या कारणावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. रामदास आठवले यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित केले होते. (Ramdas Athwale News)

रामदास आठवले (Ramdas Athwale) यांचे निमंत्रण स्वीकारून सुद्धा चंद्रकांत पाटील अनुपस्थित राहिले. त्यामुळे रामदास आठवले यांनी स्टेजवरच तीव्र नाराजी व्यक्त केली. शिक्षणाबाबतच्या मुद्यावर चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वारंवार बैठका झाल्या. चंद्रकांत पाटील यांनी आज कार्यक्रमाला यायला हवे होते, असे आठवले म्हणाले.

राज्यपाल महोदय या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास यायला हवे होते. आम्ही सरकारला सपोर्ट करत आहोत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला येण्याची चंद्रकांत पाटलांची जबाबदारी होती. मी परदेशात गेलो तरी मी अमेरिकेत असलो तरी आमंत्रण स्वीकारल्यानंतर कार्यक्रमाला पोहोचतो. असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.

आठवलेंचा कार्यक्रम टाळला

आठवले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दांडी मारुन चंद्रकांत पाटील आनंदराज आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी युतिधर्म मोडला असल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT