Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama

Vidhan Parishad Election: ठाकरे गट, भाजप अलर्ट, फोडाफोड टाळण्यासाठी उचललं मोठं पाऊल; आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम ?

Political News : कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने यावेळेस निवडणुकीत चुरस असणार आहे.

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधान परिषद निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. ऐन निवडणुकीत आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठीची खबरदारी घेतली जात आहे. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने यावेळेस निवडणुकीत चुरस असणार आहे.

दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार फुटल्याने काँग्रेसच्या (Congress) चंद्रकांत हांडोरेना पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे संख्याबळ नसताना भाजपने पाचवा उमेदवार निवडून आणला होता. या वेळेसही विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली आहे.

12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी, महायुतीला मतांची जुळवा जुळवा करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे आपल्याकडील मते फुटू नयेत याची दक्षता सर्वच पक्ष घेत आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे सर्व आमदार निवडणुकीदरम्यान हॅाटेलवर राहणार आहेत. 10,11 आणि 12 जुलै रोजी ठाकरेंचे 16 आमदारांचा हॅाटेलवर मुक्काम असणार आहे. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे हॅाटेलमध्ये गाठीभेटी घेणार आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? राजकीय विश्लेषकांचे नेमके म्हणणे काय

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करण्यात आले असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) विधान परिषद निवडणुकीसाठी 2 उमेदवार आहेत तसेच पक्षासाठी स्वतःची हक्काची 43 मते आहेत. अजूनही राष्ट्रवादीला 2 उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 मतांची गरज भासणार आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीला उमेदवार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित झाला आहे.

भाजपकडून घेतली जातेय खबरदारी

उद्धव ठाकरे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर भाजपने देखील सावध पाऊलं उचलली आहेत. भाजपच्या सर्व आमदाराना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात कसलाच दगाफटका होऊ नये, यासाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील आमदारांचा मुक्काम आता हॉटेलमध्ये असणार आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray News : जरांगे, हाकेंच्या जीवाशी खेळ का करताय? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com