Ramdas Athawale
Ramdas Athawale sarkarnama
महाराष्ट्र

Ramdas Athawale : मोठी बातमी; रामदास आठवलेंनी दिला 'एकला चलो'चा नारा; विधानसभेच्या इतक्या जागा लढणार

Pradeep Pendhare

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवले नसलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने राज्यात विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. विधानसभेच्या दहा तर, मुंबई महापालिकेत 20 जागा लढवणार असल्याची घोषणा रिपाई पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली.

मुंबई येथे रिपाई (RPI) पक्षाच्या आठवले गटाच्या प्रदेशची कार्यकारिणी आढावा बैठक झाली. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधानसभेत पक्षाची काय भूमिका राहील, यावर मार्गदर्शन करत मनोबल वाढले. रिपाई पक्षात वेगवेगळ्या आघाड्या आहेत. सर्वसमावेश, अशी पक्षाची ओळख असल्याचे सांगून विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत पक्ष मैदानात असणार असल्याचे सांगून तयारी लागा, अशा सूचना रामदास आठवले यांनी केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रिपाई आठवले गट हा महायुतीत सहभागी आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांना केंद्रात मंत्रीपद आहे. महायुतीत असून, देखील रामदास आठवले यांनी विधानसभा आणि मुंबईत महापालिकेत किती जागा लढवणार, याची घोषणा करून टाकली. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विधानसभेत किती जागा लढवू शकते, याचा काहीसा अंदाज छगन भुजबळ यांनी जाहीर केला. महायुतीत भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या प्रमुख पक्षांचा समावेश आहे. जागा वाटपावर महायुतीतील प्रमुख पक्षांची बैठक होण्यापूर्वीच पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांकडून किती जागा लढणार, याच्या घोषणा सुरू झाल्या आहेत. यामुळे महायुतीत प्रमुख भाजप पक्षाची चिंता वाढली आहे.

रिपाई आठवले गटाकडून मुंबई (Mumbai) महापालिकेत दलितांबरोबरच, मराठा, मुस्लिम, गुजराथी, उत्तर भाषिक अशा सर्व जाती-धर्मातील उमेदवारी देण्यात येणार आहे. यातून रिपाईवर असलेल्या एका जातीचा पक्षाचा शिक्का पुसरण्याचा यात प्रयत्न असणार आहे. यातून विविध जाती-धर्माची समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेत रिपाई आठवले गट करणार आहे. तेव्हा सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन निवडणुकांचे काम करा, असे आवाहन रामदास आठवले यांनी मुंबईच्या बैठकीत केले.

महायुतीत असलेल्या रिपाईने लोकसभा निवडणुकीला महायुतीचे प्रत्येक उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले. लोकसभेची एकही जागा लढवत नसताना महायुतीत रिपाईने केलेल्या कामाची दखल घ्यावी लागणार आहे. मुंबईतही महायुतीच्या सहा उमेदवारांचे रिपाईच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केले. त्यामुळे मुंबईतील सहा जागांवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल, असे विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना रामदास आठवले यांनी यावेळी केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT