Devendra Fadnavis News : भुजबळांकडून विधानसभेला 80 ते 90 जागांची मागणी; फडणवीस म्हणाले, भाजपच सर्वांत मोठा पक्ष...

Devendra Fadnavis On Chhagan Bhujbal : लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. त्यातच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत भाष्य केलं होता. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
devendra fadnavis chhagan bhujbal
devendra fadnavis chhagan bhujbalsarkarnama

Nagpur News, 27 May : लोकसभा होताच विधानसभा निवडणुकीचं ( Assembly Election 2024 ) बिगूल वाजणार आहे. त्यापूर्वी 'जागां'च्या 'वाद्या'वरून महायुतीतील पक्षांमध्ये वल्गना होऊ लागल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या शब्दाची आठवण करून देत विधानसभेला 80 ते 90 जागांची मागणी केली आहे. एकप्रकारचे भुजबळांनी 80 ते 90 जागांवर हक्क सांगत विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे. भुजबळांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच जास्त जागा लढणार असल्याचं सांगितलं आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

"राष्ट्रवादीला 80 ते 90 जागा मिळतील, असं भाजपनं ( Bjp ) सांगितलं होतं. लोकसभेला जी खटपट झाली, ती खटपट पुढे होता कामा नये. आम्हाला 80 ते 90 जागा मिळतील, असं भाजपला सांगितलं पाहिजे. तेवढ्या जागा मिळाल्या तर 50 ते 60 आमदार निवडून येतील. आता पन्नास आमदार आहेत. त्यामुळे पन्नासच जागा विधानसभेला दिल्या, तर आमदार कमी निवडून येतील. तसं होताच कामा नये. त्यामुळे आम्हाला आमचा वाटा मिळाला पाहिजे, हे आताच सांगून टाका," असं विधान छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण, तिन्ही पक्षांना योग्य जागा मिळतील, असं देवेंद्र फडणवीस ( Devendra fadnavis ) यांनी सांगितलं आहे. "विधानसभेला कोणत्या पक्षानं किती जागा लढायच्या याबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. योग्य फॉर्म्युला ठरवत तिन्ही पक्षांना योग्य जागा मिळतील. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपला सर्वांत जास्त जागा मिळतील. मात्र, आमच्यासोबत असलेल्या पक्षांचा पूर्ण सन्मान राखला जाईल," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

विधानसभेबाबत अजित पवार यांनी खबरदारी घेतल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल ( Prafull Patil ) यांनी छगन भुजबळ यांना आश्वस्त केलं आहे. "लोकसभेसारखं चित्र विधानसभेला राहणार नाही. एवढी खबरदारी अजित पवारांनी घेतली आहे. विधानसभेला आपल्याला मिळणाऱ्या जागांमध्ये नक्कीच वाढ होणार आहे," असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

devendra fadnavis chhagan bhujbal
Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांची साथ असूनही भाजपला येवल्यात चिंता?

भुजबळ यांच्या विधानावर अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाष्य केलं आहे. "आपले 54 आमदार निवडून आलेले आहेत. जागावाटपाबाबत काळजी वाटणं साहजिक आहे. पण, तसं काही समजण्याचं कारण नाही. पक्षाचे कार्यकर्ते, सहकाऱ्यांचा मानसन्मान ठेवला जाईल," असं अजित पवार यांनी म्हटलं.

devendra fadnavis chhagan bhujbal
Chhagan Bhujbal News : ...तर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com