Eknath Shinde News: शिंदे जाणार? महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा...; शिवसेनेचा नेता म्हणाला, "निवडणुकीपर्यंत..."

Mahayuti News: राज्यातील लोकसभेसाठीचं सर्व टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. लोकसभेनंतर आता काही महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच आता पुन्हा राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis Sarkarnama
Published on
Updated on

CM Eknath Shinde News: शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात भाजप आणि शिवसेना (BJP And Shivsena) शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. तर या भाजप-शिंदेसेनेच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. भाजपच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान, काही काळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन भाग पडले आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. तर अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होताच एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

या चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पूर्णविराम दिला होता. "महायुतीतील सर्वांत मोठ्या पक्षाचा नेत्याच्या नात्याने मी सांगतो की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. दुसरे कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही बदल होणार नाही." असं म्हणत त्यांनी शिंदेंच्या सीएम पदाला कोणताही धक्का लागणार नसल्यांचं स्पष्ट केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र नुकत्याच राज्यातील लोकसभेसाठीचं सर्व टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. लोकसभेनंतर आता काही महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच आता पुन्हा राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता खरोखरंच शिंदेंच्या जागेवर दुसरं कोणी मुख्यमंत्री बनणार का? या प्रश्नावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उत्तर दिलं आहे. शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाण्याचा कोणताही चान्स नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलण्याचा चान्सचं नाही

आमदार संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मुख्यमंत्री बदलला जाणार, अशी कोणतीही चर्चा सुरु नाहीये, मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काही लोकांना वावड्या उठवण्याची सवय असते. परंतु, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीर आहेत, मजबूत आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलण्याचा चान्स नाही. ते जोरात काम करणारे मुख्यमंत्री असून 24 तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री बदलला जाणार नाही नाही नाही." असं शिरसाट यांनी ठामपणे सांगितलं.

अजितदादांनी फोन का केला?

यावेळी शिरसाट यांना पुण्यातील 'हिट अँड रन' (Pune Hit And Run Case) प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. या प्रकरणात अजित पवारांनी पुण्याच्या आयुक्तांना फोन का केला यावरुन वाद सुरु आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, "अजितदादांनी फोन का केला? त्याने का केला नाही, याने का केला? अशा चर्चांना काहीही अर्थ नाही. या घटनेत दोघांचा जीव गेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, याच्याशी सरकार सहमत असून पोलिस त्या दृष्टीने काम करत आहेत."

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Porsche Crash Case: पुणे 'कार'नामा; फडणवीसांची भूमिका संशयास्पद, पटोलेंचा गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com