Parbhani News: राज्यसभेच्या महाराष्ट्रासह देशभरातील 37 जागांसाठी निवडणूक येत्या 16 मार्चला निवडणूक होत आहे. यात महाराष्ट्रातील डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले या खासदारांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार आहे.
या सात जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच आता रामदास आठवले यांनी मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (ता.25) परभणीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीतील पुन्हा उमेदवारीवर भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
आठवले यांनी मी राज्यसभेवर जाणार हे मला आधीच माहीत आहे, मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा असल्याचं बोलून दाखवतानाच मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या गोटात राजकीय बॉम्ब टाकला आहे.
रामदास आठवले यावेळी रिपब्लिकन पार्टीच्या सर्व गटांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मतही व्यक्त केलं. या एकत्रीकरणाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी यांनी केल्यास समाजाला मोठा फायदा होईल. यामुळे आमच्या समाजाची ताकद वाढेल आणि योग्य प्रतिनिधित्व मिळेल असा दावा करत त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकदा ऑफर दिली आहे.
महाराष्ट्रासह देशभरातली राज्यसभेच्या 37 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होत आहे. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार, महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीकडून एक खासदार निवडून जाणार आहे. त्यात भाजपला चार जागा मिळणार आहे. त्यात विनोद तावडेंसह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याही नावाचा समावेश आहे.
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची प्राथमिक यादी तयार झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सुमारे 10 ते 12 संभाव्य नावांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. या बैठकीत काही प्रमुख नेत्यांच्या नावांवर सहमती झाल्याची माहिती पुढे आली असून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.