Dhairyasheel Mohite Patil: भाजपशी ज्यांचा टोकाचा संघर्ष, त्याच धैर्यशील मोहिते पाटलांवर दिल्लीतून मोठी जबाबदारी,राजकीय दुरावा संपणार?

Dhairyasheel Mohite Patil : भाजपनं आपली साम दाम दंड भेद यांसह सर्व ताकद लावून लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या घेतलेल्या भूमिकेमुळे माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या होत्या. तसेच विधानसभेला सांगोला, माळशिरस, माढा आणि करमाळा या चार मतदारसंघांत भाजपला मोहिते पाटलांच्या विरोधामुळे मोठा फटका बसला होता.
Ranjitshinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil-Devendra Fadnavis
Ranjitshinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातला माढा लोकसभा निवडणुकीतला भाजपचा पराभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मोहिते पाटलांनी माढ्यात बेरजेचं राजकारण करत भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा धक्कादायक पराभव केला होता. त्यानंतर मोहिते पाटील विरुद्ध भाजप संघर्ष दिवसागणिक अधिकाधिक टोकदारच होत राहिला. विधानसभा निवडणुकीतही याचा प्रत्यय जवळून आला.पण याचदरम्यान,सोलापूर जिल्ह्यात ज्यांच्याशी भाजपचा आजतागायत तीव्र संघर्ष राहिला आहे,अशा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर (Dhairyasheel Mohite Patil) 'दिल्ली'तून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं सर्वपक्षीय नेत्यांना विविध देशांत पाठवून देशाची भूमिका मांडण्यास सांगितलं होतं. यानंतर आता जागतिक पातळीवर भारताचे सर्व देशांसोबतचे राजकीय, आर्थिक यांसह विविध प्रकारचे संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी 'संसदीय मैत्री गट' स्थापन केला आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्थापन केलेल्या या संसदीय मैत्री गटामध्ये सत्ताधारी खासदारांसोबतच इंडिया आघाडीतील महत्वाच्या खासदारांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार, संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि गौरव गोगोई हे देखील परदेशी दौऱ्यावर जाणार आहेत. या संसदीय मैत्री गटाचं सदस्यपद माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना मिळालं आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दौऱ्यासाठी 23 विविध प्रकारचे गट तयार केले आहेत. यात यासाठी या गटांच्या नेतृत्वाची जबाबदारी वरिष्ठ आणि अनुभवी खासदारांकडे देण्यात आली आहे. त्यात आता माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आता केंद्र सरकार आणि लोकसभेने मोठी जबाबदारी दिली आहे.

Ranjitshinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil-Devendra Fadnavis
BMC budget update : फडणवीस ठाकरेंना म्हणाले होते, रिसीट चाटायच्यात का? सत्ताबदल होताच नाकावर टिच्चून घेतला सर्वात मोठा निर्णय...

भाजपनं आपली साम दाम दंड भेद यांसह सर्व ताकद लावून लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांच्या घेतलेल्या भूमिकेमुळे माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या होत्या. तसेच विधानसभेला सांगोला, माळशिरस, माढा आणि करमाळा या चार मतदारसंघांत भाजपला मोहिते पाटलांच्या विरोधामुळे मोठा फटका बसला होता. यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही मोहिते पाटील पॅटर्न चांगलाच चालला होता.

प्रखर भाजप विरोधक राहिलेल्या मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांना दिल्लीतून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रातील मोदी सरकारनं भारत आणि UAE या दोन देशांमधील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं मोठी संधी मानली जात आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे भाजपकडून विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संसदीय मैत्री गटातील समावेशामुळे भाजपकडून कुठेतरी मोहिते कुटुंबाशी असलेल्या राजकीय वैर मिटवण्यासाठी टाकलेलं पाऊल तर नाही ना अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

Ranjitshinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil-Devendra Fadnavis
Gokul news : गोकुळमध्येही ‘विश्वास’घात? आबांना अस्तित्वासाठी दोनच पर्याय, ‘किंग’ असूनही ससेहोलपट होणार?

दिल्लीतून धैर्यशील मोहिते पाटील यांना संसदीय मैत्री गटातील सदस्यपदाचा मान आगामी काळात टाकल्या जाणाऱ्या राजकीय डावपेचाचा भाग नाही ना अशाही चर्चांना उधाण आलं आहे. पण मोहिते पाटलांच्या समर्थकांमध्ये आनंद आणि उत्साह संचारल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसभा अध्यक्षांनी स्थापन केलेल्या संसदीय मैत्री गटात शशी थरूर, पी. चिदंबरम, गौरव गोगोई (काँग्रेस), के. कनिमोळी (द्रमुक), डेरेक ओ'ब्रायन, अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), अरविंद सावंत (एसएस-यूबीटी), सुप्रिया सुळे (एनसीपी-एसपी), असदुद्दीन ओवैसी (एआयएमआयएम), अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव (समाजवादी पक्ष) यासारखे प्रमुख विरोधी नेते संसदीय गटांचे अध्यक्ष असणार आहे. यामध्ये संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि गौरव गोगोई यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com