Ravindra Chavan sarkarnama
महाराष्ट्र

Ravindra Chavan : युती की स्वबळाची तयारी; रवींद्र चव्हाणांनी ठणकावले, 'महापौर महायुतीचा होणार, कमळालाच मतदान करा'

Ravindra Chavan KDMC : रवींद्र चव्हाण यांनी डोंबवलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले.

शर्मिला वाळुंज

Ravindra Chavan News : मुंबईसह राज्यभरातील महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युतीची चर्चा सुरू आहे. दोघांमध्ये युती होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या प्रमाणे 15 जानेवारीला कमळालाच मतदान करा, असे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत फेक आणि निगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार करण्यात आले होते. तोच खोटा प्रचाराचा पॅटर्न आता महापालिका निवडणुकीत विरोधकांकडून पुन्हा राबवला जात असल्याचा आरोप करत, मतदारांनी सजग राहण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीचाच महापौर होणार, असे देखील चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्यात विकासाची कामे सुरू असून, या विकासाला जनतेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

चव्हाण म्हणाले की, निवडणुकीत युवा नेत्यांना संधी देण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक कोअर कमिटी घेतील. निवडून येणारा उमेदवार हा त्यामधील महत्त्वाचा क्रायटेरिया असेल. संघटन मजबूत करणारे आणि जनतेशी थेट जोडले गेलेले चेहरे पुढे आणण्यावर भर दिला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT