Ravindra Chavan  Sarkarnama
महाराष्ट्र

Ravindra Chavan : मुख्यमंत्रि‍पदासाठी नाव चर्चेत, रवींद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितले, 'गेल्या 2-3 दिवसांपासून...'

Ravindra Chavan BJP CM : काही प्रसार माध्यमांनी मुख्यमंत्रि‍पदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत असल्याचे वृत्त दिले तसेच तसेच चव्हाण यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली बोलावून घेतले होते, असे वृत्तात म्हटले होते.

Roshan More

Ravindra Chavan News : महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार आहे. उद्या (सोमवारी) भाजपच्या मुख्यमंत्रि‍पदाचे नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित मानले जात असताना अचनाक डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री होणार, असल्याच्या चर्चा सोशल मीडियामध्ये आहेत. काही प्रसार माध्यमांनी देखील याविषयी वृत्त दिले.

काही प्रसार माध्यमांनी वृत्त देताना म्हटले होते की, रवींद्र चव्हाण यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली बोलावून घेतले होते. त्यामुळे पालघरचा दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीत दाखल झाले. जातीय समीकरणामुळे चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, खुद्द रवींद्र चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र चव्हाण यांनी ट्विट करत या सगळ्या चर्चांमधील हवाच काढून घेतली. चव्हाण यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'गेल्या 2-3 दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये.'

रवींद्र चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, 'कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती.'

आझाद मैदानावर शपथविधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला आझाद मैदानावर होणार असल्याचे जाहीर केले आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार असल्याचे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलातना स्पष्ट केले होते. त्यामुळे या शपथविधीमध्ये शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ एकनाथ शिंदे हे घेणार की ते आपल्या दुसऱ्या नेत्याला संधी देणार याची उत्सुकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT