Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर आलेली ही वेळ पाहून ‘लाडकी बहीण’ भरल्या ताटावर रडली!

Maharashtra Assembly Election Mahayuti Government : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नसल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांचेच नाव आघाडीवर आहे. शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असे स्पष्ट केले आहे.
Eknath Shinde Ladki Bahin
Eknath Shinde Ladki BahinSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत, अशी चर्चा आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याचे सर्व अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना दिले आहेत. ते जे नाव पुढे करतील, त्याला आपला पाठिंबा असेल असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यावरून अनेक शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली दौरा आटोपताच सातारा जिल्ह्यातील आपले दरे गाव गाठले होते. तिथे गेल्यानंतर त्यांच्या प्रकृती बिघडली होती. त्यांना व्हायरल इन्फेक्शन असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. रविवारी दुपारी त्यांचे हेलिकॉप्टरने ठाण्यात आगमन झाले. मात्र, तत्पुर्वी सकाळी काही शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्यांना भेटण्यासाठी दरे येथील घरी दाखल झाले होते.

Eknath Shinde Ladki Bahin
Eknath Shinde News : शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार ‘ही’ नऊ खाती; संभाव्य यादी आली समोर

बीड जिल्ह्यातील माजलगावातील शेतकरी सतीश देवगुंडे हेही सकाळीच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी भेटीमागचे कारण सांगताना ते गहिवरून गेले होते. आपल्या पत्नीला सख्या भाऊ नाही. एकनाथ शिंदे हेच त्यांचा लाडका भाऊ असल्याचे देवगुंडे यांनी सांगितले. शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलेले नाही, ही माहिती समजताच पत्नी जेवण करत असतानाच रडू लागल्याचे देवगुंडे म्हणाले.

लाडकी बहीण, वीज माफी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीमध्ये 50 टक्के सवलत अशा योजना शिंदेंनी सुरू केल्याचे सांगत देवगुंडे म्हणाले, शिंदेंची लाडकी बहीण जेवण करताना रडू लागल्याने मलाही गहिवरून आले. अशा चांगल्या व्यक्तीवर ही वेळ आली. माझी पत्नी त्यांच्यासाठी रडत होती, म्हणून मी शिंदेंना भेटण्यासाठी आलो आहे. सगळ्यांची काळजी घेणारी व्यक्ती मुख्यमंत्री असावी. माझे काहीच काम नाही, फोटो काढायचा नाही, फक्त भेटायचे असल्याचे देवगुंडे म्हणाले.

Eknath Shinde Ladki Bahin
Eknath Shinde : दरे गावातून एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, 'माझा निर्णय मी घेतलाय...'

दरम्यान, दरे गावातून निघताना शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी-शाह जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले. भाजपची गटनेते निवडण्याची बैठक होईल, त्यानंतर आमची पुन्हा एक बैठक होईल. या बैठकीत मंत्रिपदांबाबत निर्णय होईल, असेही शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपद न मिळाले, तसेच अपेक्षित खाती मिळत नसल्याने ते नाराज आहेत, अशीही चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com