Chandrakant Patil And Ravindra Dhangekar sarkarnama
महाराष्ट्र

चंद्रकांतदादांवरील आरोप भाजपच्या जिव्हारी : धंगेकरांच्या लेकाचा Exclusive फोटो दाखवत जोरदार पलटवार

BJP responds to Ravindra Dhangekar Over Chandrakant Patil criticism : कोथरूडमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुढे करत शिवसेना नेते रवींद्र धंगेकर भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सतत टीका करताना दिसत आहेत.

Sudesh Mitkar

  1. कोथरूडमधील कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढून परदेशी पळाला आहे.

  2. यावरून रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली, तर भाजपने प्रत्युत्तरात एक फोटो व्हायरल केला.

  3. या फोटो वादामुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे.

Pune News : शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी कोथरूडमधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य केलं आहे. पाटील यांच्या वरदहस्तामुळेच कोथरुडमधील गुन्हेगारी फोफावल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला आहे. धंगेकरांकडून करण्यात येणारे आरोप जिव्हारी लागताच भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी धंगेकरांना थेट ठोकून काढण्याची भाषा वापरली आहे. अशात आता धंगेकरांच्या चिरंजीवाचा एक फोटो भाजपने व्हायरल केला असून यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोथरूडमधील गुन्हेगारीचा मुद्दा राजकीय वर्तुळात गाजत आहे. कोथरूडमधील गुंड निलेश घायवळ हा बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवून परदेशी पळून गेला आहे. घायवळला पळून जाण्यासाठी सरकारमधील काही नेत्यांनी मदत केल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

धंगेकर यांनी देखील या प्रकरणांमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. पाटील यांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा एक व्यक्ती असून तो निलेश घायवळ यांच्या संपर्कात आहे. तोच मिनी चंद्रकांत पाटील म्हणून वावरत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता.

हा आरोप करताना धंगेकर यांनी समीर पाटील आणि निलेश घायवळ यांचा एकत्रित फोटो सोशल मीडिया वर शेअर केला होता. तसेच समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांचा जवळचा कार्यकर्ता असून गेल्या काही वर्षांमध्ये तो 100 कोटींचा मालक कसा झाला असा देखील सवाल यावेळी धंगेकर यांनी उपस्थित केला होता. त्याच धंगेकरांचा आता भाजपने देखील एक फोटो शेअर करत जोरदार पलटवार केला आहे. या फोटोमध्ये कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासोबत धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर हा दिसत आहे.

pranav dhangekar photo with gajanan marne

प्रणव धंगेकर हा आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत बोलताना भाजपचे सहप्रचार व प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर म्हणाले, जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घर पे पत्थर नही मारा करते.

आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी धांगेकर यांनी बघावे. या फोटोमध्ये त्यांचे चिरंजीव प्रणव रवींद्र धंगेकर हे कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या सोबत काय करत आहेत? याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. मग पुण्याचे कैवारी असल्याचा आव आणावा अशी टीका त्यांनी केली आहे.

FAQs :

प्र.1: निलेश घायवळ कोण आहे?
👉 तो कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड असून त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढल्याचे समोर आले आहे.

प्र.2: रवींद्र धंगेकर यांनी कोणावर आरोप केले?
👉 त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निलेश घायवळ प्रकरणावरून टीका केली.

प्र.3: भाजपने काय प्रत्युत्तर दिले?
👉 भाजपने धंगेकर यांच्या मुलाचा गजानन मारणे सोबतचा फोटो व्हायरल करून पलटवार केला.

प्र.4: गजानन मारणे कोण आहे?
👉 गजानन मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.

प्र.5: या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
👉 शिंदे सेना, भाजप आणि विरोधकांमध्ये नव्या आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT