
Pune News : गेल्या अनेक दिवसांपासून सायलेंट मोडवर असलेले शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर हे कोथरूडच्या मधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून अटॅकिंग मोडवर आले आहेत. कोथरूड मधील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्यांवर आता धांगेकर यांनी निशाणा साधत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाक दिली आहे.
निलेश घायवळ प्रकरणांमध्ये भाजप नेत्यांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. आज देखील धांगेकर यांनी माध्यमांसमोर येत काही गौप्यस्फोट केले आहेत.
धंगेकर म्हणाले, निलेश गायवळ याने कागदपत्रांमध्ये छेडछाड करून पासपोर्ट मिळवला आणि त्या पासपोर्टच्या आधारे तो परदेशात पळून गेला आहे. त्यामुळे हा पासपोर्ट काढताना ज्या अधिकाऱ्यांनी घायवळला मदत केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी मी महासंचालकांना पत्र दिले आहेत.
या प्रकरणात माहिती घेत असताना कोथरूड मधील जी गुन्हेगारी चालते ती गुन्हेगारी समीर पाटील या नावाचा व्यक्ती सेट करत असल्याचं मला समजलं. तसंच समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांचा निकटवर्ती असून तो पाटलांच्या कानात सांगूनच सर्व गुन्हेगारीचा कारभार सुरू असल्याचं माहिती मिळाली.
या समीर पाटीलवर महाराष्ट्रात पहिला मकोका लागला असून तो नामचीन दादा असल्याचं मला माहिती घेतल्यानंतर समजलं. तसंच या व्यक्तीचे निलेश गायवळ टोळीशी संबंध असल्याचं देखील निदर्शनास आलं. या सर्व संबंधात चंद्रकांत पाटील यांना जाब विचारणे आवश्यक आहे.
या पद्धतीने आंदेकर टोळी संदर्भात कारवाई करत बुलडोझर फिरवण्यात आला त्याच पद्धतीने तो बोललो जर कोथरूडमध्ये देखील फिरवावा. चंद्रकांत पाटील हे आमचे नेते असून नेता जर चुकत असेल तर सांगणं आपलं काम आहे आणि पुणेकर म्हणून ते मी काम करत आहे.
पुण्यातील गुन्हेगारी बाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बोलले असून त्यांनी पुण्यात चाललेल्या गुन्हेगारी बाबत मी सगळ्या नेत्यांना सांगणार आहे असं सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर कोथरूडकडे तिरकी नजर टाकली तर सर्व व्यवस्थित होणार आहे. त्यांनी तसं करावं अशी माझी मागणी असणार आहे.
पुण्यातील गुन्हेगारी बाबत मुख्यमंत्र्यांना सर्व काही माहिती असून अख्ख्या महाराष्ट्राची माहिती त्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी थोडीशी तिरकी नजर टाकून इकडे बघितलं तर निलेश घायवळ कुठेही दिसणार नाही असं धांगेकर म्हणाले.
कोथरूड मधील गुन्हेगारीकडे खासदार मुरलीधर मोहोळ हेही दुर्लक्ष करत आहेत का ?याबाबत विचारला असता धंगेकर म्हणाले, सध्या राजकारण इतक्या खालच्या थराला गेला आहे की तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असंच चाललं आहे. खासदारांना हे सगळं दिसत आहे मात्र बोलायचं कुणी हा प्रश्न आहे. पुणेकरांनी त्यांना निवडून दिला आहे मात्र पुढच्या वेळी पुणेकर त्यांच्याकडे बघतील असं धंगेकर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.