Ravindra Dhangekar vs Navnath Ban Sarkarnama
महाराष्ट्र

Ravindra Dhangekar vs Navnath Ban : धंगेकरांनी कुत्रा दाखवला, नवनाथ बन यांनी सरडा! महायुतीतील वाद आता विकोपाला

Ravindra Dhangekar and BJP Navnath Ban trade sharp social media attacks after Maharashtra Legislative Council election results, escalating tensions Mahayuti alliance : विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप आणि शिंदेसेनेतील आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर; सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वातावरण तापले.

Pradeep Pendhare

Mahayuti alliance dispute : विधान परिषदेच्या निवडणुकीचे खापरफोड करताना, भाजप प्रवक्त्यांनी, एकनाथ शिंदे शिवसेनेवर केलेल्या आरोपानंतर सत्ताधारी महायुतीमधील हे दोन्ही पक्षाचे नेते, वैयक्तिक पातळीवर उतरले आहेत.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे नवनाथ बन यांच्यात सोशल मीडिया ‘वॉर’ रंगला आहे. या दोघा नेत्यांमधील सोशल वाॅरमधून महाराष्ट्राचे राजकीय मनोरंजन होताना दिसत आहे.

शिवसेनेचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी, आपल्या ऑफिशियल एक्स हँडलवर भाजप कार्यालय पोस्टर शेअर करत, समोर एक नेता छोट्या कुत्र्याला पाव टाकताना दिसतो आहे. हे पोस्टर शेअर करताना, ही याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला....!! अरे बेट्या तुझे मालक लोक, पण वाकड्यात जात नाही आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला, खोचक टोला लगावला आहे. खाली टॅग करताना, बनश्वान, चिल्ला_पुकार, Paid_Animal असे म्हटले आहे.

रवींद्र धंगेकर यांची ही पोस्ट शेअर होत नाही, तोच त्याला प्रत्युत्तर म्हणून, भाजपचे (BJP) नवनाथ बन यांनी, धंगेकर यांची पोस्ट रिकोट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रंगबेरंगी सरड्याला पुढे रवींद्र धंगेकर यांचा फोटो लावला आहे. या रंग बदलणाऱ्या सरड्यावर शिवसेना, मनसे आणि काँग्रेसचे चिन्ह असलेले पंचे लावले आहेत. काय म्हणतात पुणेकर, रंग बदलू धंगेकर! असा जोरदार टोला लगावला आहे.

विधान परिषदेतील महायुतीच्या पराभवानंतर भाजप-एकनाथ शिंदे शिवसेनेत खापरफोडी वैयक्तिक पातळीवर पोहोचली आहे. रवींद्र धंगेकर आणि नवनाथ बन यांच्यातील वाद टोकाला पोहोचले आहे. नवनाथ बन यांची बाजू घेताना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रवींद्र धंगेकरांना सुनावले होते. एकनाथ शिंदेंना टार्गेट केले म्हणून, अख्खी शिवसेना नवनाथ बन यांच्यावर तुटून पडली होती. उदय सामंत, रामदास कदम, बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनी सुनावले होते.

भाजप नेत्यांबरोबर, अजित पवार राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी देखील एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांवर विधान परिषदेच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत सर्वाधित टार्गेट झाला तो, एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष! युतीमधील वाढत्या वादावर, महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी समन्वय बैठकीचे आयोजनाचा सूर अळवला आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या नेत्यांना शांत राहण्याचा आदेश दिला आहे. पण या दोन्ही नेत्यांमधील वाद वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याने, महायुतीची समन्वय बैठकीकडे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT