Ahilyanagar DCC Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेत राम शिंदेंना मोठा धक्का : दोन समर्थक उमेदवारांची माघार; विखेंशी प्रतिष्ठेची लढाई कायम

Two candidates backed Ram Shinde withdraw from Ahilyanagar DCC Bank election ahead polling, intensifying political battle with Radhakrishna Vikhe Patil camp : मंजुषा गुंड आणि अजिनाथ हजारेंनी निवडणुकीतून घेतली माघार; मतदान न करण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट व्हायरल, आता कर्जतमध्ये ज्योती शिंदे विरुद्ध तुषार पिसाळ लढत
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ram Shinde supporters withdraw : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसाठी दोन दिवसांवर मतदान आले असतानाच, भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना निवडणुकीत धक्का बसला आहे.

राम शिंदे यांच्या नेतृत्वात बँकेच्या निवडणुकीला समोरे जाणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. मंजुषा गुंड आणि अजिनाथ हजारे या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आपणास मतदान करू नये, अशी पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल केली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ऐनवेळी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. राम शिंदे (Ram Shinde) यांनी हे उमेदवार देत, भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील-काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या सहमती एक्सप्रेसला धक्का दिला होता. शेवटच्या टप्प्यात जामखेडचे सचिन घुमरे यांना बिनविरोध करण्यात राम शिंदे यांना यश मिळवत जिल्हा बँकेच्या राजकारणात प्रवेश केला.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) 21 जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या. आता दहा जागांवर निवडणूक होत आहे. यात राम शिंदेंचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले होते. सेवा सोसायटी मतदारसंघातून कर्जतसाठी ज्योती शिंदे, महिला राखीव मतदारसंघासाठी मंजुषा गुंड तर ओबीसी गटातून अजिनाथ हजारे यांचा समावेश होता. यात मंजुषा गुंड आणि अजिनाथ हजारे यांनी निवडणुकीत अचानक माघार घेतल्याचे जाहीर केले आहे.

Ram Shinde
Nilesh Lanke DCC Bank Election : प्रत्येक डावात बाजी मारणारे नीलेश लंके यावेळी एकाकी! विखे पाटलांनी पारनेरमध्ये ताकद लावली; थोरातांची साथही विरोधात!

गुंड अन् हजारे यांनी निवडणुकीत माघार घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जिल्हा बँकेच्या मतदारांनी आपणास मतदान करू नये, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. राम शिंदे यांनी देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तयारी केली होती. परंतु यु-टर्न घेत त्यांनीही निवडणुकीतून माघार घेतली होती. आता त्यांच्याबरोबर असलेल्या उमेदवारांनी मतदानाच्या दोन दिवस अगोदर माघार घेतल्याने राम शिंदे यांच्या निर्णयाला पुन्हा धक्का बसला आहे. एकप्रकारे त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरल्यासारखे झाले आहे.

Ram Shinde
India forex reserves : रिझर्व्ह बँकेकडून परकीय चलनसाठ्याची उधळपट्टी; दोन महिन्यात 66 अब्ज डॉलरची घट, रघुराम राजन यांचा सल्ला चर्चेत

विखे समर्थक पिसाळ अपक्ष म्हणून रिंगणात...

राम शिंदे यांनी जिल्हा बँकेसाठी चार उमेदवार जाहीर करीत बिनविरोध निवडीला खो दिला होता. जामखेडची सेवा-सोसायटी जागा बिनविरोध करण्यात त्यांना यश आले. मात्र शुक्रवारी गुंड-हजारेंनी माघार घेतली. आता सोमवारी जिल्हा बँकेच्या मतदान प्रक्रियेत राम शिंदे समर्थक ज्योती शिंदे यांचा सामना विखे पाटील समर्थक तुषार पिसाळांबरोबर रंगणार आहे. यात कोण बाजी मारेल? याबाबत कर्जतमध्ये अनेकांनी पैंजा लावल्या असून राम शिंदेंसह विखे पाटी पिता-पुत्र आणि माजी संचालक अंबादास पिसाळ यांची कसोटी पाहावयास मिळणार आहे.

विखे पाटील-राम शिंदे यांच्यातच लढत

ज्योती शिंदे अन् तुषार पिसाळ यांच्यात लढत होणार आहे. ज्योती शिंदे या राम शिंदे यांच्या समर्थक आहेत. विखे पाटील-थोरात यांच्या एक्सप्रेसने राम शिंदे यांच्याविरोधात पॅनलकडून थेट उमेदवार दिलेला नाही. परंतु तुषार पिसाळ हे विखे पाटील यांचे समर्थक आहेत. त्यामुळे ही लढत उमेदवारांमध्ये असली, तरी विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातच अप्रत्यक्ष लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.