Keshav Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai High Court : एका झाडाचे गौडबंगाल! 1 कोटींचे रक्तचंदन निघाले 10 हजाराचे बिजासाल, रेल्वे हायकोर्टात

Red Sanders High Court case : केशव शिंदे यांच्याकडून जमिनीसह रक्तचंदनच्या झाडाचा मोबदला मिळावा, यासाठी मागीलवर्षी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार हायकोर्टाने रेल्वेने संबंधित शेतकऱ्याला एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले.

Rajanand More

Red Sanders worth crores : रक्तचंदनाचे झाड समजून मध्य रेल्वेने एका शेतकऱ्याला हायकोर्टाच्या आदेशानुसार एक कोटी रुपये दिले. पण झाडाची तपासणी केल्यानंतर ते रक्तचंदन नसून बिजासाल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. बिजासालची किंमत केवळ दहा हजार असल्याचा दावा करत रेल्वे आता 90 लाख रुपये परत मिळावेत, असा दावा हायकोर्टात केला आहे.

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठातील या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. याचवर्षी एप्रिल महिन्यात हायकोर्टाने एक कोटींचा मोबदला देण्याचा आदेश दिला होता. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी केशव शिंदे यांची शेतजमीन रेल्वेकडून संपादित करण्यात आली होती. याच जमिनीवर रक्तचंदनचे झाड होते.

केशव शिंदे यांच्याकडून जमिनीसह रक्तचंदनच्या झाडाचा मोबदला मिळावा, यासाठी मागीलवर्षी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानुसार हायकोर्टाने रेल्वेने संबंधित शेतकऱ्याला एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार रेल्वेने कोर्टात ती रक्कम जमा केली. पण काही दिवसांतच हे झाड रक्तचंदनचे नसून बिजासालचे असल्याचे आढळून आले.

मध्य रेल्वेला या प्रकरणामुळे धक्का बसला. त्यानंतर प्रशासनाकडून हायकोर्टात पैसे परत मिळावेत, यासाठी अर्ज करण्यात आला आहे. अद्याप या अर्जावर कोर्टात सुनावणी झालेली नाही. मात्र, या अजब प्रकारामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. वकील नीरजा चौबे या मध्य रेल्वेच्या वकील असून त्यांनी बंगळुरू येथील संस्थेच्या परीक्षण अहवालाचा हवाला दिला आहे.

नीरजा चौबे यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, रेल्वेने 1 कोटींचा मोबदला दिलेले झाड रक्तचंदन नसून बिजासाल आहे. बंगळुरू येथील संस्थेने त्याबाबतचा परीक्षण अहवाल दिला आहे. या झाडाची किंमत केवळ 10 हजार रुपये एवढी आहे. त्यामुळे आम्हाला उर्वरित रक्कम परत मिळायला हवी.

हायकोर्टाने एप्रिल महिन्यातच या झाडाचे मुल्यांकन करण्याचे आदेश वन विभागाला दिले होते. त्यानुसार पुसद वनविभागाने बंगळुरूमधील लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान या संस्थेकडे या झाडाचे नमुने पाठविले. संस्थेच्या तपासामध्ये हे झाडे बिजासाल असल्याचे स्पष्ट झाले. हाच अहवाल आता रेल्वेकडून दाखविला जात आहे.

रेल्वेच्या या दाव्यावर शिंदे कुटुंबाने शंका व्यक्त केली आहे. केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब शिंदे यांनी आपल्याला परीक्षणावर विश्वास नसल्याचे सांगितले. ते झाड बिजासालचे होते, हे माहिती असताना 2015 पासून का माहिती दिली नाही, असा सवालही त्यांनी केला. मोबदला देताना संबंधित कागदपत्रावर रक्तचंदन लिहिले होते. हे झाड बिजासालचे असले तरी त्याचे मुल्यांकडून योग्यप्रकारे झाले नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT