Mumbai terror threat : मुंबई पोलीस हाय अलर्टवर; 14 दहशतवादी, 34 ठिकाणे, 400 किलो RDX...

Mumbai Police on High Alert After WhatsApp Terror Threat : भारतात 14 दहशतवादी घुसले आहेत. बॉम्बस्फोटांसाठी 400 किलो आरडीएक्सचा वापर केला जाणार असल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
“Mumbai Police tighten security after WhatsApp terror threat claiming human bombs and RDX across the city.”
“Mumbai Police tighten security after WhatsApp terror threat claiming human bombs and RDX across the city.”Sarkarnama
Published on
Updated on

Lashkar-e-Jihadi Allegedly Behind the Threat Message : मुंबई पोलिसांनी शुक्रवारी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा मेसेज आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही धमकी आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून सर्वत्र हायअलर्ट देण्यात आला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून गणेश विसर्जनादिवशी संपूर्ण मुंबई शहरात बॉम्बस्फोट होतील, असा मेसेज पोलिसांना आला आहे.

मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने 'एएनआय'ने हे वृत्त दिले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअप क्रमांकावर हा मेसेज आला आहे. मुंबईत ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले असून स्फोटांनी संपूर्ण शहर हादरून जाईल, असे मेसेजमध्ये म्हटले आहे.

मेसेज पाठविलेल्या व्यक्तीने त्याची ओळख लष्कर ए जिहादी अशी सांगितली आहे. भारतात 14 दहशतवादी घुसले आहेत. बॉम्बस्फोटांसाठी 400 किलो आरडीएक्सचा वापर केला जाणार असल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, असे इंडिया टुडेच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

“Mumbai Police tighten security after WhatsApp terror threat claiming human bombs and RDX across the city.”
Maratha Reservation : कुणबी नोंद शोधली म्हणून लगेच जात प्रमाणपत्र मिळणार नाही! ओबीसी उपसमिती अध्यक्षांच्या वक्तव्याने वाढला संभ्रम

धमकीचा मेसेज खोटा असण्याची शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पण तरीही संपूर्ण शहरात सुरक्षा वाढविण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून शहरात गणेश विसर्जनानिमित्त सुरक्षाव्यवस्थेची तयारी केली जात असतानाचा हा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातील विविध भागांत कोम्बिंग ऑपरेशन केले जात असून विविध महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि काही संशयित आढळून आल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी मुंबईकरांना केले आहे.

“Mumbai Police tighten security after WhatsApp terror threat claiming human bombs and RDX across the city.”
Mahayuti Government : भाऊ, भाई की दादा वरचढ? महाराष्ट्रात भाजपचा शिस्तबध्द 'कार्यक्रम'...

दरम्यान, गणेश विसर्जनादिवशी शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 21 हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच पोलिसांकडून वाहतूक नियोजन आणि त्याच्या माहितीसाठी एआयचा वापर केला जाणार आहे. शनिवारी 12 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 40 उपायुक्त, 61 सहायक आयुक्त, 3 हजार अधिकारी आणि 18 हजार कर्मचारी रस्त्यावर असतील.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com