Vaishnavi Hagawane Case Sarkarnama
महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane News : 'जो त्या वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल, त्याचा सत्कार करणार, '; शरद पवारांच्या महिला नेत्याचं मोठं विधान

Vaishnavi Hagawane Crime News : वैष्णवी ही Suicidal tendency ची होती, तिने अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, त्या व्यक्तीच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी असंही म्हटलं.एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट ठरत नसल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हटलं होतं.

Deepak Kulkarni

Pune News : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी बुधवारी(ता.28) पुणे न्यायालयात सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. या सुनावणीत आरोपी कुटुंब हगवणेंच्या वकिलांनी धक्कादायक दावे केले आहेत. अज्ञात व्यक्तीसोबत वैष्णवीच्या व्हॉट्सअप चॅटचा दाखला देत तिच्या चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. पण आता वैष्णवीच्या कस्पटे कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.

पण याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी आरोपी हगवणे कुटुंबाच्या वकिलावरच हल्ला चढवला. त्या म्हणाल्या,जो त्या वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल, त्याचा मी सत्कार करणार, असंही रोहिणी खडसेंनी जाहीर करुन टाकलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी ट्विट करत हगवणेच्या कुटुंबाच्या वकिलाच्या न्यायालयातील युक्तिवादावर संताप व्यक्त केला. तसेच जो त्या वकिलाच्या चार कानशि‍लात लावेल त्याचा मी सत्कार करणार, उद्विग्न भावनाही ट्विटद्वारे व्यक्त केल्या.

आरोपींच्या वकिलाच्या या युक्तिवादावर समाजाच्या सर्वच स्तरांत संतापाची तीव्र लाट उसळली आहे. याचवेळी वैष्णवीचे मामा आणि काकांनी कस्पटे कुटुंबाची बाजू माध्यमांसमोर मांडली. त्यात आरोपी हा आरोपी असतो, तो गुन्हेगार असतो. कोणीही सहजपणे आपला गुन्हा कबूल करत नाही. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पोलीस तपास योग्य पद्धतीने चालू आहे. त्यांनी केलेल्या आरोपांचा आम्ही निषेध करतो. आमच्या वकिलावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. अशा प्रकारचं कोणतंही चॅटिंग झालं नसल्याचं वैष्णवीच्या मामांनी स्पष्ट केलं.

तसेच आम्ही कोणाचाही मोबाईल काढून घेतलेला नाही.वैष्णवीचा मृत्यू 16 तारखेला झाला.मी स्वतः17 तारखेला फोन करून बाळाची विचारणा केली, माझं करिष्मा सोबत बोलणं झालं होतं. राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मेव्हणीने सांगितलं की, बाळ रडत आहे, त्याला घेऊन जा. ही एकतर्फी प्रेमाची बाब होती, पण दुसऱ्या बाजूला पैशांवर प्रेम होतं,असं वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सांगितलं.

तर वैष्णवीचे काका म्हणाले, असा कोणताही प्रकार घडलेला नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. वकिलांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे, चॅटिंग आणि इतर आरोप चुकीचे आहेत. या प्रकरणात आता काही नवे सापडत नाही, म्हणून चुकीची माहिती पसरवली जात असून पण आमच्या मुलीवर आमचा पूर्ण विश्वास आहे,असे वैष्णवीचे काका मोहन कस्पटे यांनी ठणकावलं.

पुणे न्यायालयात वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) बुधवारी (ता.29) सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील याला 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर नवरा शशांक आणि सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणेला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

हगवणे यांचे वकील विपुल दोशी यांनी सध्या मीडिया ट्रायल सुरू केलेली आहे. जगात मोबाईलचे चॅट पोहचले आहेत आणि कुठले चॅट लपवले असे म्हणतात. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती,ते आम्ही पकडले.एक नवरा म्हणून त्याने काय केलं पाहिजे,आम्हाला न्याय हवा आहे.

वैष्णवी ही Suicidal tendency ची होती, तिने अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे,त्या व्यक्तीच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी असंही म्हटलं.एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट ठरत नसल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT