SEBI Madhabi Puri Buch : 'सेबी'च्या माजी प्रमुखांना मोठा दिलासा; हिंडेनबर्गच्या 'त्या' गंभीर आरोपांतून निर्दोष मुक्तता

SEBI News : मुंबई हायकोर्टानं मुंबई सत्र न्यायालयानं सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच ,बोर्डाचे काही सदस्य, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे काही मोठे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली होती.
Madhabi Puri Buch
Madhabi Puri BuchSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईतील विशेष न्यायालयानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियामक उल्लंघनाच्या आरोपाखाली 'सेबी'च्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि अन्य पाच अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. मात्र,या निर्णयानंतर मुंबई सत्र न्यायालयानं सेबीच्या माजी अध्यक्षा यांच्यासह अन्य पाच अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली होती.आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियामक उल्लंघन प्रकरणी क्लीनचिट देण्यात आली आहे. माधबी पुरी बुच यांच्यासाठी हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका हा मोठा दिलासा मानला जात आहे.

माधबी पुरी बुच (Madhabi Puri Buch) या 2017 पासून सेबीमध्ये कार्यरत झाल्या होत्या. तसेच मार्च 2022 मध्ये त्यांची सेबीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्यानंतर सेबीच्या अध्यक्षपद तुहिन कांत पांडे यांच्याकडे आहे.

मात्र,लोकपालांनी शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियामक उल्लंघन प्रकरणी माधबी पुरी बुच यांना लोकपालांनी क्लीनचिट दिली आहे. या रिपोर्टमध्ये सेबीच्या माजी अध्यक्षांवरील आरोप निराधार असल्याचं नमूद केलं आहे. बुच यांच्यावर त्यांचे अदानी समूहासोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

Madhabi Puri Buch
Chandrashekhar Bawankule: मंत्री बावनकुळेंनी अजितदादा पालकमंत्री असलेल्या पुण्यात घातलं लक्ष; 'या' प्रकरणी दिले मोठे आदेश

लोकपालांनी याप्रकरणी क्लिन चीट देताना सादर करण्यात आलेली साक्ष आणि कायद्याच्या निकषांवर तक्रार निभाव लागणारी नसल्याचं मत नोंदवलं आहे. त्यामुळे याप्रकरणी कुठलाही गुन्हा वा तपास केला पाहिजे असं नक्कीच ही बाब सिद्ध होत म्हटलं आहे.

मुंबई हायकोर्टानं मुंबई सत्र न्यायालयानं सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच ,बोर्डाचे काही सदस्य, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे काही मोठे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली होती. गुन्हा नोंदवण्याच्या मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशाला चार आठवड्यांची स्थगिती देण्यात आली होती.

Madhabi Puri Buch
IAS Officers Inquiry: पूजा खेडकरला दिलासा, तर दुसरीकडे एकाचवेळी 11 IAS, 2 IPS, 1 IFS अन् 1 IRS अधिकाऱ्यांची चौकशी सुरू, प्रशासनात खळबळ

बुच आणि इतर अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांनी या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेत याचिका स्वीकारत बुच आणि इतर अधिकाऱ्यांवरील कारवाईला स्थगिती दिली होती.

माधबी पुरी बुच या एक भारतीय व्यावसायिक महिला आहेत. ज्या भारतातील सिक्युरिटीज नियामक संस्था, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या 3 वर्षांसाठी माजी अध्यक्षा राहिल्या आहेत. SEBI चे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.तसेच या पदावर नियुक्त झालेल्या खासगी क्षेत्रातील पहिल्या व्यक्ती होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com