sunil shelake rohit pawar sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar On Sunil Shelke : "शेळकेंचा अहंकार वाढला, मावळची जनता...", रोहित पवारांची टीका

Akshay Sabale

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी मावळचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelake ) यांना थेट इशारा दिला होता. यानंतर शेळके यांनीही शरद पवारांना उत्तर दिलं होतं. अशातच आता आमदार रोहित पवार यांनी सुनील शेळकेंवर टीका केली आहे. "शेळकेंचा अहंकार वाढला आहे. त्यांचा अहंकार मावळची जनता नक्की उतरवेल. तसेच, शेळके हे भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवतील," असा मोठा दावाही रोहित पवारांनी केला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

लोणावळा येथे शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) उपस्थितीत मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात शरद पवारांनी सुनील शेळकेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या दमदाटीवर बोलताना त्यांच्यावर टीका केली. तसे, "मी या वाटेनं कधी जात नाही. पण, या वाटेनं जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली, तर सोडतही नाही," असा इशारा पवारांनी सुनील शेळकेंना दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पवारांनी खोटे आरोप केले राज्यभर सांगणार"

मेळावा पार पडल्यानंतर लगोलग आमदार शेळकेंनी ( Sunil Shelke ) पत्रकार परिषद घेऊन पवारांना उत्तर दिलं. "पुढील आठ दिवसांत मी दम दिलेला एकतरी व्यक्ती त्यांनी समोर आणावा, पुरावे द्यावेत, नाहीतर शरद पवारांनी खोटे आरोप केले, असं मी राज्यभर सांगणार," असं शेळकेंनी म्हटलं.

"अजित पवार गटातील 12 आमदार भाजपत जाणार"

आमदार रोहित पवार यांनी सुनील शेळकेंचा समाचार घेतला आहे. "शेळकेंचा अहंकार वाढला आहे. त्यांचा अहंकार मावळची जनता नक्कीच उतरवेल. शेळके हे भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवतील. शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केल्यामुळे मी त्यांचा निषेध करतो. अजित पवार गटातील 12 आमदार भाजपत जाणार आहेत. त्यात शेळकेंचं नाव आहे. लोकसभेनंतर अजित पवार गटातील 22 आमदार शरद पवारांबरोबर येतील," असंही रोहित पवार म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT