Sharad Pawar : "मला 'शरद पवार' म्हणतात, माझ्या वाटेला गेला, तर...", पवारांचा शेळकेंना थेट इशारा

Sharad Pawar On Sunil Shelke : "लोकशाहीत एखाद्या नेत्याची गोष्ट चुकली, तर टीका करायची नाही का?" असा सवाल शरद पवारांनी शेळकेंना विचारला आहे.
Sharad Pawar, Sunil Shelke
Sharad Pawar, Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. लोणावळ्यातील 333 कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला आहे.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी 'घड्याळ' काढून 'तुतारी' हाती घेतली आहे. या वेळी शरद पवारांनी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना थेट इशारा दिला आहे. "तू आमदार कुणामुळे झाला?" अशा शब्दांत शरद पवारांनी शेळकेंना खडसावलं आहे.

Sharad Pawar, Sunil Shelke
Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरातील दोन्ही खासदारांचे देव पाण्यात, पुन्हा उमेदवारीसाठी धडपड अन् आटापिटा

नेमकं काय घडलं?

मावळ मतदारसंघात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आमदार सुनील शेळकेंकडून ( Sunil Shelake ) दमदाटी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

हाच मुद्दा घेऊन शरद पवारांनी सुनील शेळकेंना सुनावलं आहे. "लोकशाहीत एखाद्या नेत्याची गोष्ट चुकली, तर टीका करायची नाही का?" असा सवाल शरद पवारांनी शेळकेंना विचारला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता?"

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "येथील आमदारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बैठकीला येऊ नये म्हणून दमदाटी केली. कुणी टीका केली, तर त्यांना फोन करण्यात आला. किती गंमतीची गोष्ट आहे.

लोकशाहीत एखाद्या नेत्याची गोष्ट चुकली, तर टीका करायची नाही का? जाहीर बोलायचं नाही का? तसं बोललं, तर दमदाटी करायची का? बाबारे तू आमदार कुणामुळे झाला? तुझ्या सभेला इथे कोण आलं होतं? पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता?"

Sharad Pawar, Sunil Shelke
Eknath Shinde News : अखेर ठरलं! मुख्यमंत्री 'या' दिवशी जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात; महायुतीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न

"कार्यकर्त्यांना पुन्हा दमदाटी केली, तर..."

"उमेदवारीच्या फॉर्मवर माझी सही आहे. माझ्या सहीनं निवडणुकीला उभे राहिला. तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांनाच तुम्ही दमदाटी करत आहात. पुन्हा दमदाटी केली, तर 'शरद पवार' म्हणतात मला... मी या वाटेनं कधी जात नाही. पण, या वाटेनं जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली, तर सोडतही नाही," असा इशारा शरद पवारांनी सुनील शेळकेंना दिला आहे.

R

Sharad Pawar, Sunil Shelke
Lok Sabha Election 2024 : पोरांच्या उमेदवारीसाठी उतारवयात 'बापमाणसं' मुंबईत ठाण मांडून; कोणाला मिळणार यश?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com