Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरातील दोन्ही खासदारांचे देव पाण्यात, पुन्हा उमेदवारीसाठी धडपड अन् आटापिटा

Kolhapur Lok Sabha Election 2024 : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर अमित शाहांनी खासदारांना शब्द देऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण...
sanjay mandlik dhairyashil mane
sanjay mandlik dhairyashil manesarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर शिंदे गटातील विद्यमान खासदारांचे धाबे दणाणले आहेत. विद्यमान आमदार पुन्हा लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) लढवण्यासाठी इच्छुक असले तरी जिंकून येणाऱ्या उमेदवारालाच संधी द्या, हट्ट धरू नका, अशी सूचना अमित शाह ( Amit Shah ) यांनी केल्यानंतर राज्यातील शिंदे गटाच्या खासदारांना लोकसभेचे तिकीट मिळणार नाही, अशी जवळपास शक्यता दाट झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा ( Kolhapur Lok Sabha Constituency ) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ( Hatkangale Lok Sabha Constituency ) दोन्ही विद्यमान खासदारांची हीच अवस्था झाली असून, आपल्या उमेदवारीसाठी अक्षरशः आटापिटा आणि धडपड करण्याची वेळ आली आहे.

sanjay mandlik dhairyashil mane
Eknath Shinde News : अखेर ठरलं! मुख्यमंत्री 'या' दिवशी जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात; महायुतीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांतील आढावा भाजपच्या केंद्रीय सर्वेक्षणातून समोर आल्यानंतर दोन्हीही विद्यमान खासदारांबद्दल नागरिकांची नाराजी आहे. शिवाय भाजपच्या तिकिटावरून लढल्यास निवडून येण्याची शक्यता ही कमीच आहे. त्यामुळे राज्यातील काही जागांवर भाजपच्या चिन्हावर लढवण्यासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी यापूर्वीही अनुमती दर्शवली आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनीच खासदारांना शब्द देऊन निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याची आठवण करून देण्याची वेळ आता शिंदे गटाच्या खासदारांवर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदारांवरदेखील हीच परिस्थिती उद्भवली आहे. उमेदवारीचा शब्द घेऊन आलेल्या दोन्ही खासदारांना आपल्या उमेदवारीबाबत शंका आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने ( Dhairyashil Mane ) यांनी लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. मात्र, भाषणावेळी उमेदवारी निश्चित नसल्याचे सांगतात. केंद्रीय आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या पातळीवरून जो निर्णय घेण्यात येईल, त्याबरोबर आम्ही राहणार असल्याचे स्पष्ट करतात, तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबाबत ही हीच परिस्थिती आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची उद्घाटनं सुरू आहेत. त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित नसल्याचे सांगतात.

sanjay mandlik dhairyashil mane
Lok Sabha Election 2024 : पोरांच्या उमेदवारीसाठी उतारवयात 'बापमाणसं' मुंबईत ठाण मांडून; कोणाला मिळणार यश?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे विद्यमान खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांची उमेदवारी सध्या तरी निश्चित मानली जात आहे. तरी त्यांच्याही मनात आत्तापर्यंत उमेदवारीबाबत धाकधूक आहे. सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या भक्कम पाठिंबात संजय मंडलिक यांचा विजय निश्चित मानला जात आगहे. तरी, जनतेच्या मनात मंडलिक यांच्याबाबत नाराजी असल्याचे सांगितले जाते. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपने हालचाली केल्या होत्या. मात्र, हा विषय मागे पडला. सध्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाच्या खासदारांची उमेदवारी निश्चित नसली तरी दोघांपैकी एका खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

sanjay mandlik dhairyashil mane
Lok Sabha Elections 2024: लोकसभेसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! 'हे' आहेत संभाव्य उमेदवार

दरम्यान, कोल्हापूर हातकणंगलेसह अन्य शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढवल्याची माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यमान जागांवर उमेदवारी घ्यावी, अन्यथा भाजपकडून उमेदवारी घेण्याचा प्रस्ताव मंत्री शिंदे यांच्यासमोर ठेवल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत अधिक चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, 13 पैकी एका खासदाराचे तिकीट कापणार हे निश्चित मानले जात असल्याची माहितीही समोर येत आहे.

R

sanjay mandlik dhairyashil mane
Ramdas Kadam: माझेही नाव रामदास कदम आहे...; भाजपला सज्जड दम; निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत वादाची ठिणगी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com