Rohit Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar On Gulabrao Patil : 'शाळेतील विद्यार्थ्यांच्या मागे पण आता ईडी लावता का? रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना टोला

Rohit Pawar Criticized Gulabrao Patil : रोहित पवार म्हणाले, 'मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा.

Roshan More

Rohit Pawar News : आम्ही जसे राजकीय पक्षाची लोक फोडतो तसं तुम्ही इंग्रजी शाळेचे विद्यार्थी फोडा, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना दिला. यावरून त्यांच्यावर टीका होत असताना त्यांनी यू टर्न घेत आपण फक्त विनोदात बोललो असे म्हटले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

'आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्यामागेही मंत्री महोदय ईडी,सीबीआय, आयटीच्या चौकशीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय', असा टोला रोहित पवार यांनी गुलाबराव पाटलांना लगावला आहे. याविषयी रोहित पवारांनी ट्विट देखील केले आहे.

पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये 'मंत्री महोदय, विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील', असा सल्ला गुलाबराव पाटलांना दिला आहे.

...तर 10 लाख देतो

गुलाबराव पाटील म्हणाले, जे शिक्षक दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी फोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत आणतील त्या शाळेला मी आमदार निधीतून 10 लाखाचा निधी देईल. हिंदी सिनेमात जसं म्हणतात चून चून के मारेंग तसं आपण आपण चून चून के बच्चे लायेंगे.

गुलाबराव पाटील नेमके काय म्हणाले?

गेल्यावर्षी आपल्या जळगाव ग्रामीण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या 43 हजार होती. मी विचारले याच्यामध्ये किती वाढ झाली तर मला सांगितले की काहीच वाढ झाली नाही. आम्ही जसे पक्षाची लोकं फोडतो तस तुम्ही पोरं फोडली पाहिजेत. आपण यावर बक्षिस ठेवणार आहोत. यावेळेस जी जिल्हा परिषदची शाळा ग्रामीण जास्तीत जास्त विद्यार्थी फोडून आणेल त्या शाळेला आमदार फंडातून मी दहा लाख रुपये देईल. पोरं फोडा फक्त.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT