Maharashtra politics; Manikrao Kokate, Rohit Pawar And Eknath Shinde sarkarnama
महाराष्ट्र

Manikrao Kokate : महायुतीमध्ये तिसऱ्या मंत्र्याची विकेट पडणार, मुंडे, कोकाटेंनंतर एकनाथ शिंदेंचा विश्वासू रडारवर; पवारांनी थेट नावच सांगितलं

Rohit Pawar On Manikrao Kokate And Sanjay Shirsat : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच रोहित पवार यांच्या एका ट्वीटने एकच खळबळ उडवून दिली आहे.

Aslam Shanedivan

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे.

  2. कोकाटे सध्या बिनखात्याचे मंत्री असून त्यांच्यावर अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

  3. आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचा दावा करत संजय शिरसाठ यांचे नाव घेतले आहे.

Mumbai News : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आमदार रोहित पवार यांनी, मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय असल्याचे म्हटलं आहे. तर कोकाटेंनंतर एकनाथ शिंदेंचा विश्वासू रडारवर असल्याचेही म्हटले आहे. त्यांनी केलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खातेबदलाबाबत राज्यापल आचार्य देवव्रत यांना पत्र दिले होते. त्याप्रमाणे त्यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत. यानंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या असून विरोधी महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षातील आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी, मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्यानेच नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. पण त्यांनी नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. मात्र त्यांनी तसे काही केलं नाही किंवा सरकारने घेतला नाही. जर त्याचवेळी त्यांचा राजीनामा सरकार घेतला असता तर खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार ‘वेगवान’ आहे हे दिसले असते.

त्या निर्णयामुळे किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे. असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय.

याचवेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्र्याकडे बोट दाखवत आपण त्यांची विकेट पडण्याची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी, महायुतीमध्ये तिसऱ्या मंत्र्याची विकेट पडणार असून मुंडे, कोकाटे यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचा विश्वासू रडारवर असल्याचे संकेत दिले आहेत.

त्यांनी, आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत असे सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळं आता विरोधकांचा मोर्चा माणिकराव कोकाटे यांच्यानंतर मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे वळणार असल्याचं बोललं जात आहे.

FAQs :

1. माणिकराव कोकाटेंचे कोणते खाते काढून घेण्यात आले?
➡️ त्यांच्याकडील क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे.

2. खाते काढून घेण्याची शिफारस कोणी केली?
➡️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती.

3. सध्या कोकाटे कोणत्या स्थितीत आहेत?
➡️ ते सध्या बिनखात्याचे मंत्री असून अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

4. रोहित पवार यांनी नेमकं काय विधान केलं?
➡️ कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याची विकेट पडेल, असे म्हणत त्यांनी संजय शिरसाठ यांचे नाव घेतले.

5. या विधानामुळे काय परिणाम होऊ शकतो?
➡️ शिंदे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातील राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT