Manikrao Kokate politics: छगन भुजबळ यांना टार्गेट करता करता माणिकराव कोकाटे स्वतःच झाले हिट विकेट!

Nashik-minister- Manikrao- kokate -target-Chhagan- Bhujbal-but-lost- ministry-himself-बिनधास्त स्वभावाची वक्तव्ये आणि आक्रमक कार्यशैली माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाच्या मर्गात अडसर ठरली
Manikrao-Kokate
Manikrao-KokateSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: शासकीय सदनिका प्रकरणी बनावट कागदपत्र करणे किती महागात पडू शकते, याचे उदाहरण पुढे आले आहे. त्यात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले आहे. महायुती सरकारला हा दणका बसला.

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे बिनधास्त स्वभाव आणि परखड वक्तव्य यासाठी प्रसिद्ध आहेत. विरोधकांना थेट शिंगावर घेण्याची त्यांची कार्यशैली आहे. या कार्यशैलीमुळेच ते पाच वेळा सिन्नर मतदारसंघातून आमदार झाले.

ज्या कार्यशैलीमुळे आणि राजकीय स्वभावामुळे कोकाटे आमदार झाले. तोच स्वभाव ते राजकीय करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना नडला. या स्वभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा लागला.

Manikrao-Kokate
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन '100+' वर ठाम, शिंदे शिवसेना पक्षाच्या अफाट अपेक्षा ठरताहेत महायुतीला अडसर?

महायुती सरकार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. त्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याला चार मंत्री मिळाले. महाराष्ट्रात मोजक्याच जिल्ह्यांना एवढी पदे मिळाली होती.

Manikrao-Kokate
Manikrao Kokate Politics: प्रचार, मंत्रिमंडळ बैठकांना हजेरी, हे सांगत वकिलांनी बंद केल्या मंत्री कोकाटेंच्या पळवाटा, न्यायालयही म्हणाले, मग कसे आजारी...?

मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी माणिकराव कोकाटे यांचे थेट नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नवा बाद निर्माण झाला होता.

छगन भुजबळ यांनी मंत्रीपदासाठी डावलल्याने थेट भाजपशी जवळीक केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना त्यांनी लक्ष्य केले. या वादात कोणीही अजित पवार यांच्या बाजूने भुजबळ यांच्या विरोधात गेले नव्हते.

मंत्रीपदाच्या आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री कोकाटे यांनी मात्र थेट छगन भुजबळ यांना अंगावर घेतले. छगन भुजबळ यांना त्यांनी आरोप करून हैराण केले होते. त्यामुळे कोकाटे आणि भुजबळ यांचा हा वाद राज्यभर चर्चेत आला.

मंत्री धनंजय मुंडे यांची विकेट पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने छगन भुजबळ यांना मंत्री केले. मात्र या सर्व राजकीय घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी भुजबळ यांना शिंगावर घेणारे मंत्री कोकाटे यांनाच आपली विकेट गमवावी लागली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत हळहळ व्यक्त होणे स्वाभाविक आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com