sunil tatkare On rohit pawar  sarkarnama
महाराष्ट्र

NCP internal conflict : सुनेत्रा पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र, त्यानंतर काहीच वेळात प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा रोहित पवारांना इशारा; म्हणाले, 'अजितदादा असतानाही...'

Political News : पक्ष विलीनीकरणाची घाई कोणाला झाली होती. पक्ष ताब्यात घेण्याची घाई कोण करीत होते, असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

सरकारनामा ब्युरो

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर बुधवारी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवार यांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी केलेल्या सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले. अजितदादा असतानाही मला टार्गेट करण्यात आले होते. त्यांनी आता आमच्या पक्षाबाबत बोलणे थांबवावे. पक्ष विलीनीकरणाची घाई कोणाला झाली होती. पक्ष ताब्यात घेण्याची घाई कोण करीत होते, असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावताना सुनील तटकरे म्हणाले, 'त्यांनी आमच्या पक्षासोबत बोलणे टाळावे, अजितदादा असताना अनेक कारनामे केली. 2014 पासून मला टार्गेट केले जात आहे. पक्षात काय सुरु आहे हे रोहित पवार यांनी पाहावे. प्रसिद्धीसाठी रोहित पवार यांनी माझ्यावर आरोप केले आहेत.

अजितदादा असताना अनेक कटकारस्थाने केली आहेत. तुम्ही पार्थ व वाहिनीविरोधात कारस्थाने केली आहेत. दादाच्या अपघातांनंतर काय काय झाले याची माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे त्या सर्व आरोपांबाबत आम्हाला बोलता येते, असे म्हणत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

यापूर्वीही अनेकवेळा मला टार्गेट करण्यात आले होते. रोहित पवार यांनी आता आमच्या पक्षाबाबत बोलणे थांबवावे. त्यांनी त्यांच्या पक्षाचे पाहावे. पक्ष विलीनीकरणाची घाई कोणाला झाली होती. पक्ष ताब्यात घेण्याची घाई कोण करीत होते, असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, बुधवारी दुपारी खासदार सुनील तटकरे हे विधानभवनात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी दोघांमध्ये काय चर्चा झाली? या बाबतचा तपशील समोर आलेला नाही. या दोन नेत्यांमध्ये अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ चर्चा सुरु होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT