Mohan Bhagwat  Sarkarnama
महाराष्ट्र

RSS Mohan Bhagwat : सकाळीच मोहन भागवतांचे मतदान, व्यक्त केली मोठी अपेक्षा !

Sachin Deshpande

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. यात नागपूर, चंद्रपूर, रामटेक, गडचिरोली-चिमुर, भंडार-गोंदिया या पाच मतदारसंघात निवडणूक होत आहे. सर्वात लक्षवेधी निवडणूक नागपूर येथे होत आहे.

भाजप उमदेवार नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात ही लढत आहे. नागपूर येथे लोकशाही उत्सवात सहभागी होत 'शत प्रतिशत' मतदान काळाची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते मतदान झाल्यावर माध्यमांशी बोलत होते.

विदर्भात गडचिरोली -चिमुर मतदारसंघात नामदेव किरसान यांची थेट लढत ही अशोक नेते यांच्या सोबत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते (Ashok Nete) यांना उमेदवारी दिली आहे.

तर प्रत्युत्तरादाखल काँग्रेसने नामदेव किरसान या नवख्या उमेदवारावर विश्वास दाखवला आहे. तर, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात बाळू धानोरकर (Balu Dhanorkar)यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात भाजपचे सुधीर मुनगंटीवार अशी लढत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रामटेक मतदारसंघातून 2014 ला पावणेदोन लाख तर 2019 ला सव्वा लाखाच्या लीडने निवडणूक आलेल्या खासदार कृपाल तुमानेंचा शिवसेनेने पत्ता कट केला आहे. शिंदें गटाकडून काँग्रेसच्या राजू पारवेंना (Raju Parve) संधी देण्यात आली आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात या वेळी तिरंगी लढत आहे. रामटेकमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी आपले नशिब आजमवले आहे. किशोर गजभिये यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon), गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील 8 लाख 30 हजार 265 मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 18 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.

तर आमगाव विधानसभा मतदारसंघातील 2 लाख 62 हजार मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यात 5716 अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

सर्वच मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरू झाले. अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा क्षेत्रात मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत असून, तिरोडा व गोंदिया विधानसभा क्षेत्रात सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.

विदर्भात उन्हाचे वाढते प्रमाण पाहता 19 एप्रिल शुक्रवार मतदानाच्या दिवशी हीट वेव्हच्या (उष्णतेची लाट) अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल व कॅमेरा डिव्हाइस नेण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातला आहे. मतदारांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

काय म्हटले डाॅ. मोहन भागवत

मतदान आपले कर्तव्य आहे. मतदान आपला अधिकार आहे. 100 टक्के मतदान झाले पाहिजे. हे पहिले काम मी मतदानाचे केल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत म्हणाले.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात मतदारांकडून डाॅ. भागवत यांनी मोठी अपेक्षा व्यक्त करत मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. शत प्रतिशत मतदान करण्याचे त्यांचे आवाहन राज्यासह देशात मतदानाची टक्केवारीत वाढ करण्यात मोलाची मदत करेल.

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT