Rupali Chakankar  Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Chakankar News: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर फार्महाऊसवर 'मुळशी पॅटर्न' जंगी पार्टी ? एका 'स्टेटस'मुळे फुटलं बिंग

After Rupali Chakankar’s resignation grand celebration at Mulshi: चाकणकरांच्या राजीनामा पार्टीत कोण सहभागी होते, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत विरोधक कोण आहेत, याबाबत चर्चा सुरु आहे

सरकारनामा ब्यूरो

Pune News: अशोक खरात या भोंदूबाबाच्या संपर्कात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपद आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागले आहे. खरात यांच्याशी जवळीक असल्याच्या कारणाहून विरोधकांनी रुपाली चाकणकरांना सळो की पळो करुन सोडले होते. त्यांचा राजीनामा घेतल्यावर विरोधांनी आता त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

अशातच त्यांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात रंगलेल्या एका जंगी पार्टीची चर्चा सध्या दबक्या आवाजात पुणे जिल्ह्यात होत आहे. पार्टीत सहभागी असलेल्या एका सदस्याच्या 'स्टेटस'मुळे हा प्रकार बाहेर आला आहे.

चाकणकरांच्या राजीनामा पार्टीत कोण सहभागी होते, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत विरोधक कोण आहेत, याबाबत चर्चा सुरु आहे. या पार्टीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकरांना आदेश दिला होता. त्यानंतर चाकणकरांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सूपुर्त केला होता. त्यांच्या राजीनाम्याची बातमी पसरताच काही जणांनी मुळशी तालुक्यातील एका फार्महाऊसमध्ये सदस्यांनी 'मुळशी पॅटर्न'ला साजेसा असा गॉगल लावून जल्लोष केला होता, त्या सेलिब्रेशनचे स्टेटस् एका सदस्यांने ठेवल्याने या पार्टींचे बिंग फुटले.

रूपाली चाकणकर यांना खरात याच्यासोबतची ओळख चांगलीच भोवली आहे. दोन्ही महत्वाच्या पदाचा राजीनाम द्यावा लागला, पण हे प्रकरण येथे थांबले नाही तर चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या (Shivnika Sansthan) आजी-माजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीची शक्यता आहे.

सध्या अशोक खरातच्या मोबाईल डेटावरून त्यांच्याशी संबधीत व्यक्ती, उद्योगपती, नेते कोण होते याची माहिती घेतली जात आहे. त्यांचे कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणीवर एसआयटीचे पथक करीत आहे. आज खरात यांची पोलिस कोठडी संपली असता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT