Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचा गटनेता ठरला! इंदापूर तालुक्यातील 'या' नेत्याला मिळाला मान!
Shrimant Dhole News : पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. 73 पैकी 51 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि गटनेता म्हणून कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. आज राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
श्रीमंत पोपट ढोले यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद गट नेते पदी निवड करण्यात आली. श्रीमंत ढोले हे दोन वेळा इंदापूर तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत.
जिल्हा परिषद सदस्यांची आज पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर व विठ्ठल शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गटनेता निवड झाली. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून गटनेते पदाचे नाव निश्चित केले होते.
यावेळी आमदार रमेश थोरात, संभाजी कुंजीर, माजी आमदार अशोक पवार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, पीडीसीसी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे , सर्व तालुकाध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष कोण?
गटनेता हा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणार की नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार याबाबत अजून पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गटनेतेच अध्यक्ष असेल असे नाही, दुसऱ्या नेत्याच्या नावाचा देखील विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

