Rupali Chakankar SIT Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Chakankar : "होय मी खरात आणि त्याच्या पत्नीला गुरू मानलं होतं..."; SIT चौकशीत चाकणकरांची कबुली, नेमकं काय म्हणाल्या?

Rupali Chakankar SIT Inquiry : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एसआयटी चौकशीसाठी काल बोलवाण्यात आलं होतं. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी तब्बल 6 तास चाकणकरांची चौकशी केली.

Jagdish Patil

Rupali Chakankar SIT Inquiry : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या नाशिकमधील भोंदू अशोक खरातमुळे चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. अशोक खरातसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

शिवाय विरोधकांनी टीका केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवण्यात आलं होतं. दोन्ही पदं गेल्यानंतर त्यांना खरात प्रकारणी सहआरोपी करा अशी मागणी देखील विरोधकांकडून केली जात होती.

अशातच आता चाकणकर यांना एसआयटी चौकशीसाठी बोलवाण्यात आलं होतं. त्यानुसार काल रविवारी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी तब्बल 6 तास चाकणकरांची चौकशी केली. यावेळी खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर होत असलेल्या आरोपांबाबत त्यांना सविस्तर विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या चौकशीनंतर एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं. मात्र, एसआयटी चौकशी दरम्यान चाकणकरांनी खरात आपला गुरू असल्याचं मान्य केल्याचं समोर आलं आहे.

माझे कुटुंब वारकरी संप्रदायाचे असून, मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला आध्यात्मिक श्रद्धेपोटी गुरू मानले होते, असं रुपाली चाकणकर एसआयटीसमोर मान्य केलं आहे. माझे आणि खरातचे आर्थिक संबंध नसून खरातकडे जाण्यासाठी मी कुणालाही आग्रह केला नसल्याचंही त्यांनी एसआयटीला सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिवाय खरातची दुसरी बाजू मला माहीत नव्हती, असंही त्यांनी एसआयटीच्या चौकशी दरम्यान स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता यापुढे एसआयटीकडून खरात प्रकरणी नेमकी काय पावलं उचलली जाणार? आणि चाकणकरांवर काही कारवाई होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तर चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या, "एसआयटीचौकशीत मी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिली असून नक्कीच त्यांचं माझ्या उत्तराने समाधान झालं असेल, असा विश्वास वाटतो. शिवाय पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय प्रश्न विचारले हे अहवालातून तुम्हाला कळेल."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT