Pune News, 11 May : भोंदू अशोक खरातमुळे अडचणीत सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना काल एसआयटीसमोर हजर राहावे लागले. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती.
ज्यामध्ये त्यांनी, 'रूपाली चाकणकर हजर आहे सर...!' असं लिहित चाकणकरांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता आज सुषमा अंधारे आज विधानमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर होणार आहेत.
दुपारी २ वाजता ही सुनावणी पार पडणार असून, अंधारे यांच्यावर असलेल्या हक्कभंग प्रस्तावा प्रकरणी त्या काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी हक्कभंग समितीने अंधारे यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. मात्र, त्यावेळी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. आज होणाऱ्या सुनावणीसाठी त्या पूर्ण तयारीनिशी मुंबईत दाखल झाल्या आहेत.
"मागील वेळी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याची एकट्याची चौकशी करण्यात आली होती." आता अंधारे स्वतः समितीसमोर जाणार आहेत. दुपारी दोन वाजता विधान भवनामध्ये हक्क भंग समितीसमोर त्या आपला बचाव कशा प्रकारे करतात आणि समिती काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी विधानपरिषदेच्या हक्कभंग समितीची कारवाई सुरू आहे.
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर समितीने या प्रकरणाची दखल घेतली होती. त्यानंतर गेल्या वर्षी दोघांनाही नोटीस बजावत सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मागील काही महिन्यांपासून अंधारे आणि कामरा हे हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहत असून, प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.