Sachin Ahir  Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena News : शिवसेनेत जाण्याचा प्लॅन कधी, कसा ठरला? कोणी संपर्क केला? सचिन अहिर यांनी अखेर सगळंच सांगितले

Political News : शिवसेनेनं ऑपरेशन टायगर यशस्वी केले. मात्र, त्यानंतर आठ दिवसातच आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी व आमदार सचिन अहिर यांना फोडत थेट विधान परिषदेचे सभापतीच केले.

Sachin Waghmare

Maharashtra Legislative Council News : राज्यातील वातावरण गेल्या आठ ते दहा दिवसापासून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार व विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना फोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंचे सहा खासदार फुटणार याची चर्चा गेल्या सहा महिन्यापासून रंगली होती. शिवसेनेनं ऑपरेशन टायगर यशस्वी केले. मात्र, त्यानंतर आठ दिवसातच आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी व आमदार सचिन अहिर यांना फोडत थेट विधान परिषदेचे सभापतीच केले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारासोबतच होते.

अचानक त्यांनी शिवसेनेत जाऊन अर्ज भरल्याने सर्वांसाठीच त्यांचा प्रवेश धक्कातंत्र ठरला. तर काही जणांनी सहा खासदार फोडल्याचे बक्षीस त्यांना मिळाला असल्याचा आरोप केला होता. मात्र, हा निर्णय का व कधी घेतला याबाबत सचिन अहिर यांनी आतापर्यंत सस्पेन्स ठेवला होता. मात्र शिवसेनेत जाण्याचा प्लॅन कधी, कसा ठरला? त्याबाबत अहिर यांनी अखेर सगळंच सांगितले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना सोडल्यानंतर सचिन अहिर यांच्यावर टीका झाली. यानंतर त्यांच्यावर केल्या जात असलेल्या सर्व आरोप फेटाळून लावत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. विशेषतः अहिर यांनी पत्रकाराकडून विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे दिली आहेत.

सचिन अहिर (Sachin Ahir) यांना तुम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा राज्यभरात खळबळ उडाली, तर हा निर्णय नेमका कधी झाला होता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अहिर म्हणाले, ‘काही गोष्टी असतात त्या गोष्टींना काही राजकीय संकेत असतात, किंवा नियम असतात. त्यामुळे त्या सर्व गोष्टी अशा जाहीर व्यासपीठावर बोलायच्या नसतात. मात्र एक गोष्ट नक्की आहे, की हे फार आधीपासून काहीही ठरलेले नव्हते. अनेकांनी तर असेही म्हटले की, लोकसभेचे खासदार फोडले म्हणून त्यांना बक्षिस देण्यात आले. परंतु असे काही घडले नव्हते ही काही दिवसांपूर्वीची चर्चा होती.’

दरम्यान, एक दिवस असा आला की अचानक सचिन आहीर यांनी महायुतीकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरला, आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हे नेमक कधी ठरले होते आणि निर्णय कधी झाला? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर आहिर म्हणाले की, असे काही नव्हते की फार महिने चर्चा चालली आहे. काही आठवडे चर्चा चालली अशातला काही भाग नव्हता.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, उपसभापतीपदाची निवडणूक ही अधिवेशनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होते. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही इच्छा प्रकट केली की तुमच्यासारखी लोक आमच्या पक्षातून चांगल्या पदावर जाऊन त्यांनी सामाजिक कार्य केले पाहिजे.'

त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी देखील म्हटले. मी पहिल्यांदा खुलासा करतो की मुळातच आम्ही शिवसेना पक्षातून निवडून आलो आहोत. सभापतीपद हे कुठलंही राजकीय पद नसते. सभापती पद हे असे पद आहे की, विधान परिषदेचे जे सदस्य आहेत, ते कोणालाही अनुमोदन त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यामुळे त्यांनी इच्छा प्रगट केल्यानंतर पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी उमेदवारी दाखल केली, आणि त्या माध्यमातून उपसाभापतीपदाची निवड बिनविरोध झाली. त्यावर विरोधी पक्षाने देखील त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली, असे अहिर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT