Sachin Ahir to contest from Worli Sarkarnama
महाराष्ट्र

Sachin Ahir Politics : आदित्य ठाकरेंचे टेन्शन वाढले; वरळीच्या मैदानात सचिन अहिर उतरणार! जाहीर सभेत दिला शब्द, '...चमत्कार घडवणार'

Sachin Ahir vs Aaditya Thackeray : काही जणांनी वरळीच्या मतदारांना ग्रहीत धरलं आहे. वरळीचा सातबारा आपल्या नावावर समजत आहेत, अशी टीका सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता केली.

Roshan More

Worli constituency political battle: सचिन अहिर यांना फोडत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. अहिर हे शिंदेंच्यासोबत गेल्याने वरळी विधानसभा मतदारसंघातील गणित बदलल्याची चर्चा आहे. त्यातच सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमात भरसभेत केलेल्या वक्तव्याने विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना 2029 ची विधानसभा जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून वरळीमध्ये विधानसभेचे उमेदवार 2024 च्या निवडणुकीत होते. मात्र, त्यांचा आदित्य ठाकरेंनी पराभव केला. शिवसेनेच्या सभेत बोलताना सचिन अहिर म्हणाले की, 'मिलिंद देवरा हे दुर्देवाने काही मतांनी निवडून येऊ शकले नाही. मिलिंदची वरळीची विधानसभेची जागा आम्ही तुम्हाला देणार नाही. आप दिल्ली देखो हम गल्ली देखते है.'

मिलिंद देवरा यांना विधानसभेची उमेदवारी नको, असे संकेत देतानाच पुढे सचिन अहिर म्हणाले की, 'आमच्या इकडेचे जे कोणी इच्छुक असतील आणि पक्ष ज्या कोणाला संधी देईल उमेदवारी देईल. वरळीकरांच्या साथीने मी सांगतो हा वरळीकर हा चमत्कार घडवणारा आहे.'

आदित्य ठाकरेंचे नाव न घेता अहिर यांनी टोला लगावला. ते म्हणाले. 'वरळीकर डोक्यावर घेणारा पण आहे आणि डोक्यावरून आपटणारा पण आहे. कारण या मतदारांना ग्राह्य धरलं जात आहे. काही लोकांनी सातबारावरच वरळी लिहून टाकली.'

2024 च्या निवडणुकीत काय घडले?

2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत वरळीतून दुसऱ्यांदा लढणारे आदित्य ठाकरेंच्या लीडमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यांना या निवडणुकीत 63 हजार 324 मते मिळाली. तर, त्यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांना 54 हजार 523 मते मिळाली. आदित्य 8 हजार 801 मतांनी येथे विजय मिळवला होता. तर, 2019 मध्ये याच मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना तब्बल 78 टक्के मते होती. या निवडणुकीत त्यांनी 67 हजार 427 मतांनी विजय मिळवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT