Sambhajiraje Chhatrapati  Sarkarnama
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati : हल्ली कोणी उठून काहीही इतिहास सांगतोय! संभाजीराजे छत्रपती यांचं सरकारला साकडं

Sambhajiraje Chhatrapati : हल्ली कोणी उठून काहीही इतिहास सांगतोय! कुणालाही भान राहिलेले नाही. यावर ठोस उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा.

Sudesh Mitkar

सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मनमानी मांडणी केली जात असून, चुकीच्या संदर्भांमुळे लोकभावनांना ठेच पोहोचत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अधिकृत संशोधनावर आधारित परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी केली आहे.

संभाजीराजे म्हणाले, हल्ली कुणीही उठून आपापल्या आकलनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मनाला वाटेल तसा सांगत आहे. इतिहासाची प्रतारणा होईल, लोकभावनेस ठेच लागेल, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील, याचे कुणालाही भान राहिलेले नाही. यावर ठोस उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा.

शासनाने शिवचरित्राचे संशोधक, अभ्यासक व चिकित्सक यांची संशोधन समिती स्थापन करून भक्कम संदर्भावर आधारित शासकीय चरित्रग्रंथ प्रकाशित करावा, जेणेकरून शिवचरित्रावरील व्याख्याने, मालिका, नाटक, चित्रपट आदी सर्व साहित्यांस हा शासकीय चरित्रग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल आणि इतिहासाविषयी वादंग उठणार नाही. याविषयी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी. मी या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे.

इतिहासाची दिशाभूल होऊ नये, याकरिता शासनाने शिवचरित्र अभ्यासक, संशोधक व चिकित्सकांची समिती स्थापन करून शास्त्रशुद्ध संशोधन करावे, अशी भूमिका पुढे आली आहे. या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र, ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, पत्रव्यवहार व संशोधनपर निष्कर्ष यांचा समावेश असावा, अशी अपेक्षा आहे.

हा ग्रंथ अधिकृत असल्याने शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, चित्रपट, नाटके, मालिका आदींसाठी तो प्रमाणित संदर्भ म्हणून वापरता येईल. त्यामुळे चुकीच्या माहितीमुळे होणारे वाद आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्नही टळतील.

शिवचरित्रप्रेमी, अभ्यासक आणि इतिहास संशोधक यांनी शासनाने तातडीने पावले उचलून अधिकृत ग्रंथनिर्मितीची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शिवरायांचे कोल्हापूरचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. विशेषतः काही अभ्यासकांनी या ग्रंथाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली आहे. आता शासन या मागणीला कसा प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT