Nagpur BJP : अधिकाऱ्यांना वेळेत कामे करण्याची तंबी देणाऱ्या भाजप नेत्याच्या बंगल्याचंच काम कंत्राटदारांनी पाडलं बंद

Department of Public Works : लाडक्या बहिणींसह महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भरमासठ योजना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे. या योजना जाहीर केल्या तेव्हा विरोधकांच्यावतीने राज्याला कर्जबाजारी केले जात असल्याचा आरोप केला जात होता.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 06 Feb : लाडक्या बहिणींसह महायुती सरकारने (Mahayuti Govt) विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भरमासठ योजना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे. या योजना जाहीर केल्या तेव्हा विरोधकांच्यावतीने राज्याला कर्जबाजारी केले जात असल्याचा आरोप केला जात होता.

सरकारने तो फेटाळून लावला असला तरी आर्थिक चटके आता जाणवायला लागले आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणाऱ्या नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशने कोट्यवधीच्या थकबाकीसाठी भाजप नेते नागपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या सरकारी बंगल्याचे काम बंद पाडले आहे.

नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशने कोट्यवधीच्या थकबाकीसाठी दोन दिवसांपूर्वीच काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता. नागपूर विभागाची सुमारे पाच ते सहा हजार कोटींची थकबाकी सरकारकडे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कंत्राटदारांच्या असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला काम बंद आंदोलन पुकारत असल्याचे अवगतसुद्धा केले होते.

पाच ते दहा टक्के रक्कम देऊन सरकार प्रत्येकवेळी चालढकल करते आणि कामे काढून थकबाकी वाढवत असल्याचा आरोप कंत्राटदारांचा आहे. नेहमीच आंदोलन केले जात असल्याने राज्य शासनाने कंत्राटदारांच्या इशाऱ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्या रविभवन येथील शासकीय बंगल्यात सुरू असलेली डागडुजी व इतर कामे बंद पाडली आहेत.

BJP Flag
Maharashtra Budget 2025 : ठाकरेंची शिवभोजन थाळी अन् शिंदेंचा आनंदाचा शिधा बंद होणार? लाडकी बहीण योजनेचा खर्च भरून काढण्यासाठी सरकारच्या हालचाली

सोबतच आता रस्त्यांचे व शासनामार्फत सुरू असलेली विकास कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री बावनकुळे यांना रविभवन येथील 11 क्रमांकाचे कॉटेज देण्यात आले आहे. येथे त्यांचा कक्ष, स्वीय सहायक व अन्य कर्मचाऱ्यांचे कक्ष, प्रतीक्षालयासाठी शेड, विद्युत कामे, रंगरंगोटी व इतर कामे केली जात होती.

आंदोलन पुकारले असताना काही कंत्राटदारांनी कामे सुरूच ठेवल्याचे लक्षात येताच असोसिएशनच्या सदस्यांनी हे काम थांबवले. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालायाचे नूतनीकरण, ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या जुन्या कार्यालय परिसरात उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी सुरू अससेली कामे थांबवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकाराने शंभर दिवसांत करावयाच्या विकास कामांचा रोडमॅप तयार केला आहे.

BJP Flag
Shiv Sena UBT Politics : भाजपची ऑफर सोडून राष्ट्रवादीचे वेध लागलेला उद्धव ठाकरेंचा शिलेदार कोण?

बावनकुळेंनी नागपूर (Nagpur) जिल्ह्यात सात प्रकल्प घोषित केले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी वेळेत कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. मात्र थकबाकीमुळे त्यांच्याच बंगल्याचे कामे थांबवली असल्याने इतर कामे कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com