Shiv Sena UBT Politics : भाजपची ऑफर सोडून राष्ट्रवादीचे वेध लागलेला उद्धव ठाकरेंचा शिलेदार कोण?

Kolhapur Political Update BJP NCP News : आधीच कोल्हापुरात विधानसभेला एकही जागा आणि नेतृत्व शिल्लक नसल्याने ठाकरेंना कोणी नेता देता का नेता? अशी म्हणायची वेळ आली आहे.
Shiv Sena Uddhav Thackeray
Shiv Sena Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही जागा न मिळाल्याने अनेकांना अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी देखील महायुतीच्या वाटेवर आहेत, असे सांगितले जाते.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर, जिल्ह्यातील काही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. याला आता ठाकरेंची शिवसेनाही अपवाद राहिलेली नाही. आधीच कोल्हापुरात विधानसभेला एकही जागा आणि नेतृत्व शिल्लक नसल्याने ठाकरेंना कोणी नेता देता का नेता? अशी म्हणायची वेळ आली आहे. त्यात आहे तो गट पक्षांतर्गत गटबाजीमुळे विखुरला आहे.

Shiv Sena Uddhav Thackeray
P N Patil Group Kolhapur : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पाटील गट जिद्दीला पेटला, भोगावतीच्या विजयाने राहुल पाटलांना उभारी!

वरिष्ठ नेतेही तक्रारीची दखल घेत नसल्याने ठाकरे गटामधील काहींची अस्वस्था वाढली आहे. शिवाय सत्तेत नसल्याने विकासकामाच्या शर्यतीत मागे पडत चाललो आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांची होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यामागे कोणाचा तरी हात असावा, जेणेकरून त्यांच्या मार्फत मतदारसंघातील विकास साधण्यात यश मिळेल, अशी मानसिकता काही पदाधिकाऱ्यांची आहे.

त्यातूनच एक कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला महायुती मधील राष्ट्रवादीचे वेध लागले असल्याचे बोलले जात आहे. ठाकरेंच्या या शिलेदाराला भाजपकडून देखील ऑफर आहे. मात्र भाजपमध्ये जाण्यास संबंधित पदाधिकाऱ्याचा स्पष्ट नकार आहे.

Shiv Sena Uddhav Thackeray
Income Tax raid : घरवापसी पूर्वीच घुसले इन्कम टॅक्सचे अधिकारी, 30 तासानंतर ही निघेणात बाहेर, दादांच्या निकटवर्ती याची कोंडी?

आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व राहील. या प्लॅनिंग मध्ये या पदाधिकाऱ्याने शहरातील काही राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. त्या संदर्भातील चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहेत. तर संबंधित पदाधिकाऱ्यांने आपण राष्ट्रवादीत आलो तर कसा प्रभाव पाडू शकतो, याचे उदाहरण वरिष्ठ नेत्यांना देखील पटवून दिली आहे.

राष्ट्रवादीचे वेध लागलेल्या या पदाधिकाऱ्याने मोठ्या पदावर देखील दावा सांगितला आहे. मात्र राष्ट्रवादी मधीलच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा या व्यक्तीला घेण्यास स्पष्ट नकार आहे. विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपल्यात वाटेकरी नको, हा पदाधिकारी राष्ट्रवादीत आल्यास आपल्या अस्तित्वालाही धक्का लागेल अशी भीती आहे. त्यामुळे काहींनी या पदाधिकाऱ्याला घेण्यास विरोध केला आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चा मध्ये सध्या ठाकरे गटाचा हा शिलेदार कोण? भाजपची ऑफर सोडून राष्ट्रवादीत जाण्याचा नेमकं कारण काय? असे सवाल उपस्थित होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com