Sandeep Kshirsagar News Sarkarnama
महाराष्ट्र

MLA Sandip Kshirsagar News : बीडमध्ये ऑडिओ-व्हिडिओ 'वाॅर'! आमदार संदीप क्षीरसागर यांनी तहसीलदाराला धमकी दिल्याची क्लीप व्हायरल..

Maharashtra MLA Sandeep Khirsagar allegedly threatens a Tehsildar, with the audio clip of the incident going viral on social media. : हा ऑडिओ 2023 च्या जुलै महिन्यातील असल्याचे बोलले जाते. उंब्रत खालसा विषयात तुम्ही ग्राम रोजगार सेवकाला नोटीस का काढली? अशी विचारणा क्षीरसागर तहसीलदारांना करतात.

Jagdish Pansare

Beed News : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. खंडणी. खून जीवे मारण्याच्या धमक्या आणि अनेक अवैध प्रकारांमुळे बीड जिल्ह्याची राज्यातच नाही तर देशात चर्चा सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मीक कराडसह आठ आरोपी अटकेत आहेत. तर वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्यामुळे त्यांनाही आपले मंत्रिपद गमवावे लागले.

या प्रकारानंतर बीड (Beed News) जिल्ह्यात एकमेकांच्या समर्थकांचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. भाजपा आमदार सुरेश धस यांचे समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या याचा एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे दररोज नवनवे कारनामे समाज माध्यमांवर समोर आले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा नायब तहसीलदाराला धमकावत असल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

या कथित ऑडिओमध्ये संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) हे सुरेंद्र डोके नावाच्या तहसीलदाराला ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नको, मला ना विचारता तू रुजू कसा झाला? अशी विचारणा करत धमकावत आहेत. संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता असलेल्या व्यक्तीच्या चुकीबद्दल डोके यांनी त्याला नोटीस बजावली होती. यामुळे संतापलेल्या संदीप क्षीरसागर यांनी थेट डोके यांना फोन करून 'तुझं नाटक मीच बघेन बर का, माझ्या मतदार संघात तमाशा करू नकोस',अशी धमकी दिली.

हा ऑडिओ 2023 च्या जुलै महिन्यातील असल्याचे बोलले जाते. उंब्रत खालसा विषयात तुम्ही ग्राम रोजगार सेवकाला नोटीस का काढली? अशी विचारणा क्षीरसागर तहसीलदारांना करतात. यावर साहेब त्याची तक्रार आली होती असे, म्हणताच कशाची तक्रार, त्याची सही वगैरे काही नाही. एक तर तुम्ही माझ्या मतदारसंघात चार्ज मला न विचारता घेतला आहे. तुम्हाला असं वाटतं आहे का? सहा महिन्यात सरकार आलं तर आपलं काही होणार नाही. तू महाराष्ट्रात कुठेही असला तरी सोडणार नाही, सांगतो.

तू माझ्या मतदारसंघात तमाशा करू नकोस, तुझे नाटक मीच बघेल बर का? असा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ही ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून या जुन्या ऑडिओ क्लिप नेमकं बाहेर कोण काढतयं ? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या ऑडिओ आणि व्हिडिओ प्रकरणामुळे बीड मधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT