MLA Sandip Kshirsagar News : बीडचा पाणीप्रश्न अजित पवारांनी सोडवला! संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना अखेर यश

Ajit Pawar takes a significant decision as an obstacle is removed in Beed's new water supply scheme : थकित वीजबिलाची एकूण रक्कम 41 कोटी 75 लाख रुपयांचे 30 टक्के म्हणजेच 12 कोटी रूपये अगोदर भरून वीज कनेक्शन जोडावे व उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्यात यावी, याकरिता जिल्हा नियोजन विकास निधीतून तरतूद करावी.
MLA Sandip Kshirsagar News
MLA Sandip Kshirsagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर वारंवार अजित पवारांना का भेटतात? यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर संताप व्यक्त करत ते मतदारसंघातील प्रश्न घेऊन माझ्याकडे आले होते, असा खुलासा केला होता. अखेर ही भेट कशासाठी होती हे समोर आले आहे. वीस दिवसांनी पाणी मिळणाऱ्या बीडकरांच्या पाणीप्रश्नावर तोडगा निघाला आहे. बीडच्या नवीन‌ पाणीपुरवठा योजनेला वीज कनेक्शन देण्याचा मार्ग आज मोकळा झाला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधित विभागाला आदेश देत जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांचे आभार मानले आहेत. बीड शहरासाठी जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व स्तरांवर अनेक वर्षांपासून सुरू असलेला अखंडित पाठपुरावा आणि अथक परिश्रम यांना अखेर आता यश आले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अजितदादा यांच्याकडे याबाबत न्याय मागितला आणि तो अजितदादांनी दिला. (Beed News) बीडच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी आणि थकीत वीजबील भरण करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून तरतूद करा, असे निर्देश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी जिल्हाधिकारी व बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिले आहेत. बीडला सध्या कार्यरत असलेली पाणीपुरवठा योजना खूप जुनी आहे. त्यावर बीड शहराचा वाढलेला विस्तार आणि लोकसंख्या यांमुळे या सध्या कार्यरत असलेल्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा हा बीड शहराच्या आवश्यकतेपेक्षा अतिशय कमी आणि अपूरा होत आहे.

MLA Sandip Kshirsagar News
Sandip Kshirsagar News : 'त्यांचे तोंड सुद्धा बघू नका' असे सांगणारेच आता एकत्र; संदीप क्षीरसागरांची टीका

परंतु त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की सध्याच्या आणि भविष्यातील बीड शहराच्या पाण्याच्या आवश्यक त्या क्षमतेची 'अटल अमृत पाणीपुरवठा योजना' संपूर्ण काम पूर्ण होऊन तयार आहे. केवळ एकच बाब अडचणीची आणि अडसर ठरली, ती म्हणजे बीड नगरपालिकेकडे महावितरण विभागाची एकूण 41 कोटी 75 लाख रूपयांची वीजबिल थकबाकी आहे. आणि पहिलीच थकबाकी असल्याने नवीन योजनेला नव्याने वीज कनेक्शन महावितरण विभागाकडून दिले जात नव्हते.

MLA Sandip Kshirsagar News
Ajit Pawar बोलले ते खरंच झालं... नवीन जिल्हा अन् तालुका निर्मितीला ब्रेक, समिती बरखास्त!

त्यामुळे आवश्यक्तेपेक्षा अतिशय कमी क्षमता असलेल्या जुन्या पाणीपुरवठा योजनेतूनच बीड शहराला अनियमित पाणीपुरवठा सद्यस्थितीत केला जात आहे. परिणामी, बीड शहराचे पाणीस्त्रोत असलेल्या माजलगाव बॅकवॉटर आणि बिंदुसरा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना देखील बीड शहरात 20 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. प्रत्येक अधिवेशनात, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न मांडला.

MLA Sandip Kshirsagar News
Beed News : "निष्पक्ष चौकशीसाठी राजीनामा द्या"; विद्रोही साहित्य संमेलनात मुंडेंविरोधात ठराव

शासनस्तरावर पाठपुरावा करून अनेकवेळा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागणी लावून धरली, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा बैठका घेतल्या. शेवटी काही तोडगा निघत नसल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर अजितदादा‌ पवार साहेब बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून दोनवेळा यासंदर्भात भेट घेऊन याबाबत त्यांच्याकडे न्याय मागितला. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व संबंधित विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली.

MLA Sandip Kshirsagar News
NCP Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आव्हान; ‘राष्ट्रवादी’ निर्णायक वळणावर...

या बैठकीत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडून, नगरपालिकेकडे असलेलली थकित वीजबिलाची एकूण रक्कम 41 कोटी 75 लाख रुपयांचे 30 टक्के म्हणजेच 12 कोटी रूपये अगोदर भरून वीज कनेक्शन जोडावे व उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्यात यावी, याकरिता जिल्हा नियोजन विकास निधीतून तरतूद करावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. पाठपुरावा आणि निरंतर केलेल्या प्रयत्नांतून बीड शहराचा जिव्हाळ्याचा सुरळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटणार असल्याबद्दल आमदार संदीप क्षीरसागर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com