Sanjay Raut Devendra Fadnavis Sunil Shelke sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut Vs Sunil Shelke : संजय राऊतांच्या टार्गेटवर सुनील शेळके, 'त्या' प्रकरणात कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Sanjay Raut Devendra Fadnavis Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील आंबळे गावात बेकादा बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Roshan More

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांचे विश्वासू आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपाविषयी तसेच शेळके यांच्यावर कारवाई करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

सुनील शेळके यांनी राज्य शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भ्रष्टाचार व जनतेची फसवणूक वगैरे विषयांवर आपण नेहमीच बोलत असता. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू असे आपले धोरण आहे. प्रत्यक्षात राज्यातले चित्र नेमके उलटे आहे, असे राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

काय म्हटले पत्रात?

'महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी, औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक ४ येथे मावळातील गाव मौजे आंबळे आहे. या गावात व त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. सदर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळास वापरण्यासाठी योग्य नसल्याने ते सर्व खाणीचे गट, जमिनी वगळण्यात आल्या. तरी सुनील शेळके आपल्या आमदार पदाचा दुरुपयोग करून औद्योगिक क्षेत्रामध्ये आंबळे येथील त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या २९ हेक्टर ८६.१० आर क्षेत्रावर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने शासन निर्णय (१९६१ च्या प्रकरण ६) काढून सदरच्या जमिनी संपादन करत आहेत व तसेच शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे.', असा आरोप राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे.

राॅयल्टी भरली नाही

शेळके यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही. तसेच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत गौण खनिज उत्खनन केलेले आहे.सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्खनन करताना त्या जमिनीमधून असणारे मुख्य गाव रस्ते फोडले , ग्रामस्थांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत शासनाकडून शेळके यांना कोत्याही प्रकारचा जाब विचारण्यात आलेला नाही.या सर्व प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी सहभागी आहेत. त्याचीदेखील काशी आपल्या कार्यालयामार्फत करण्यात यावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.

एसआयटी स्थापन करण्याची मागणी

संजय राऊत यांनी अपल्या पत्रात म्हटले आहे की, बेकायदेशीर उत्खनन केलेल्या सर्व क्षेत्राची मोजणी करून संपूर्ण रॉयल्टी दंडासह वसूल करण्याबाबतचे आदेश आपल्या कार्यालयामार्फत देण्यात यावेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने संपादनासाठी लढलेली अधिसूदना त्वरित रद्द करावी व संबंधितांवर त्वरित फौजदारी कार्यवाही करावी.

मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्यावी लूट कशा पद्धतीने सुरू आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. पैशाअभावी ज्यातील अनेक योजना रखडल्या, शेतकयांची कर्जमाफी होत नाही, पण शेळकेसारखे आमद्वार सरकारची लूट करून बार झाले, या प्रकरणी गुन्हा दाखल करावाच, पण एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेशही द्यावेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT