Sanjay Raut .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut News : तुरुंगात लिहिलेल्या संजय राऊतांच्या पुस्तकाला 'नरकातला स्वर्ग' हे नाव विश्वजीत कदमांच्या सासऱ्यांनी दिलं

Shivsena MP Sanjay Raut Narakatla Swarg Book : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी(ता.17) होणार आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातील स्वर्ग’मध्ये लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी राजकारणातील अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भातही मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. पण या पुस्तकाच्या नावावरुन बरीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र,आता संजय राऊतांनीच (Sanjay Raut) 'नरकातला स्वर्ग' या नावाबाबत मोठा खुलासा केला आहे.

खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात ईडीनं अटक केल्यानंतर कारागृहात काढलेल्या 104 दिवसांवर आधारित त्यांनी 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी (ता.17)होत आहे. पण त्यांच्या पुस्तकाला 'नरकातला स्वर्ग' Narkatla Swarg हे नाव काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे सासरे आणि प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनीच दिले असल्याची माहिती खुद्द राऊतांनीच समोर आणली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी याबाबत संवाद साधताना पुस्तकाच्या नावावर भाष्य केलं. ते म्हणाले,तुरुंगात काय नरक असतो, तो सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही जे सिनेमात पाहता,एखादा राजकारणी,डॉन आतमध्ये जातो.तिथे त्याचं सगळं छान चाललेलं असतं. पण या सगळ्या कथाकल्पित कथा असतात. तसं तिथं प्रत्यक्षात अजिबातच नसतं.एखादा खासदार,आमदार,मंत्री आतमध्ये जातो.त्याला विशेष सवलत असतं,असं काही नसतं.

तुरुंगात तुम्ही गेल्यावर जी काही तिथली शिक्षा असते,ती तशीच भोगावी लागते. तुम्ही तुरुंगाच्या छोट्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर ही शिक्षा सुरू होते. तुम्ही एकदा का आतमध्ये गेला की,तुमचा जगाशी असलेला संबंध पूर्णपणे संपतो.तोच दरवाजा प्रत्येकासाठी असतो.तोच नरकाचा दरवाजा आहे,असंही राऊत म्हणाले.

तुरुंगाच्या त्या दरवाजातून आत पाऊल टाकल्यावर सुरुवात होते.सगळ्यांना माहिती आहे,मी संजय राऊतच आहे, पण तरीही तिथे सर्वात पहिल्यांदा तुमची ओळख पटवली जाते की,तुम्ही संजय राऊतच आहात. तिथे ओळख माणूस म्हणून नव्हे,तर नंबर म्हणून असते. त्या नंबरवरच तुमचा सगळा तिथला कारभार चालतो. या नंबरचा कैदी कुठं आहे,त्या नंबरचा कैदी कुठे आहे यावर सगळं असल्याचंही राऊतांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणाले,तोच तर हा तुरुंगातला नरक आहे. त्यात प्रत्येक माणूस आपआपला आनंद शोधत असतो. कुणी बाहेरचा चहा तिथं आणून दिला,बिस्कीट आणून दिलं. तिथं जर समजा आम्ही असं चहा बिस्कीट घेतलं तर ते आनंदाचे क्षण म्हणजे आमच्यासाठी एकप्रकारे स्वर्गच असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. तिथे आमच्यासारखे जे लोक आनंदाचे क्षण मिळवतात,ते स्वर्ग म्हणतात असंही त्यांनी म्हटलं.

राऊत म्हणाले, पुस्तकाचं जे नाव आहे ना'नरकातला स्वर्ग' हे पुण्यातले एक खूप मोठे उद्योगपती आहे अविनाश भोसले,ते त्यांनी दिले आहे.त्यांची ती कल्पकता आहे.ते आपले सहकारीच असतात ना,सहाध्यायी. तिथेही तसेच सगळे सहकारी असतात. तिथे साधी माणुसकीही मेंटेन केली जात नाही. तिथे माणसांबरोबर उंदीर आणि घुशी राहतात. हे सगळं कुठं तरी लिहायला पाहिजे. मी लिहिल म्हटलं,तेव्हा भोसले म्हणाले की,लिहा तुम्ही. आणि पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग असं द्या, असंही त्यांनी सुचवल्याचं यावेळी संजय राऊतांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT