Jagdish Devda :भाजपच्या विजय शाहांनंतर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्रीही बरळले; म्हणाले,संपूर्ण देश, देशाची सेना अन् सैनिक PM मोदींच्या चरणी...

BJP Leader Controversy : एकीकडे विरोधकांकडून भाजपसह महायुतीच्या या भूमिकेवर हल्लाबोल केला जात असतानाच एकापाठोपाठ भाजपच्या मंत्र्यांची वादग्रस्त विधानं सुरुच आहे. याच विधानाचा आधार घेत देवडा यांनी भारतीय सेनेचा अवमान केला आहे,असा आरोप केला जातोय.
Jagdish Devda .jpg
Jagdish Devda .jpgSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवून भारतीय लष्करानं पाकिस्तानला घरात घुसुन चोख प्रत्युत्तर दिले. मात्र,भारत -पाकिस्तान दरम्यान युध्दजन्य परिस्थिती असताना कणखरपणे भारताची बाजू मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपाचे नेते तथा मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर आता मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनीही भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

जबलपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी भारतीय सेना तसेच लष्कराबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं.यावेळी त्यांनी संपूर्ण देश, देशाची सेना आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहे, असं विधान करुन नवा वाद ओढवून घेतला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपनं ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढत शक्तिप्रदर्शन केलं होतं.तसेच महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडूनही ऑपरेशन सिंदूरबाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

Jagdish Devda .jpg
Kolhapur Politics: महाडिकांना नेमका कोणाचा 'गेम' करायचाय? मुश्रीफांना राज्यस्तरावर डॅमेज, तर सतेज पाटलांना जिल्ह्यातच रोखण्याची खेळी...

एकीकडे विरोधकांकडून भाजपसह महायुतीच्या या भूमिकेवर हल्लाबोल केला जात असतानाच एकापाठोपाठ भाजपच्या मंत्र्यांची वादग्रस्त विधानं सुरुच आहे. याच विधानाचा आधार घेत देवडा यांनी भारतीय सेनेचा अवमान केला आहे,असा आरोप केला जातोय. तसेच काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री देवडा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा म्हणाले, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे पूर्ण देश कृतज्ञ आहे,असं ते म्हणाले.

Jagdish Devda .jpg
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या; ममता बॅनर्जींचा निवडणुकीच्या तोंडावर दोन बड्या नेत्यांना झटका

तसेच भारतानं दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर दिले आहे. मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाची सेना, सुरक्षा दल तसेच सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहोत,असे कौतुकोद्गारही काढले. यानंतर विरोधकांकडून भाजप नेत्यांकडून भारतीय सेनेचं महत्त्व कमी करुन पंतप्रधानांचं मोठेपण ठळक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

मात्र, आपल्या विधानामुळे वाद पेटल्याचं लक्षात येत झाल्यानंतर देवडा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, माझ्या विधानाची मोडतोड करून काँग्रेस पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे. देशाच्या सेनेने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे मी म्हणालो होतो. देशाची पूर्ण जनता सेना तसेच सैनिकांच्या चरणी नतमस्तक आहे, असे मी म्हणालो होतो. आपण देशाच्या सेनेचा पूर्ण सन्मान करत असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com