Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut on Waqf Bill : 'वक्फ विधेयक लाडक्या उद्योगपतींसाठी, RSS चा पाठींबा नाही...', संजय राऊतांनी वात लावली

Sanjay Raut Waqf Amendment Bill : वक्फ बोर्ड विधेयकाला फक्त मुस्लिमांचा विरोध आहे असे नाही. तर, आरएसएसचा देखील या बिलाला तसा पूर्ण पाठींबा नाही.

Roshan More

Sanjay Raut News : वक्फ सुधारणा विधेयक आज (बुधवार) लोकसभेत मांडले आहे. या विधेयकावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, वफ्त बोर्डाच्या संपत्ती काही उद्योगपतींना घेण्यासाठी सोपं व्हावं, यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे.

वक्फ बोर्डाचा विषय हा लाखो लाखो कोटी रुपयांच्या पाॅपर्टी संदर्भात आहे. यामध्ये कोणाला तरी घुसवून आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का? त्यासाठी झालेली ही पायाभरणी आहे. हे मला स्पष्ट दिसतय, असे देखील संजय राऊत म्हणाले.

वक्फची साडेआठ लाख त्यांची पाॅपर्टी आहे आणि अडीच लाख कोट रुपये त्याची किंमत झाली आहे. या पाॅपर्टीवर सरकारच्या जवळ असलेल्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा. त्यासाठी हा कार्यक्रम सुरू असावा, असे देखील राऊत म्हणाले.

'वक्फ बोर्ड विधेयकाला फक्त मुस्लिमांचा विरोध आहे असे नाही. तर, आरएसएसचा देखील या बिलाला तसा पूर्ण पाठींबा नाही. भाजपने औरंगजेबाच्या कबरीबाबत घेतलेल्या भूमिकाला आरएसएसने विरोध केला. याच पद्धतीने वक्फच्या विधेयकाला विरोध केल्याची माझी माहिती', असे देखील संजय राऊत म्हणाले.

हिंदूंसाठी विधेयक आणणार का?

मुंबईत जैन धर्मीय हिंदुंना जागा नाकारतायेत मग एखाद्य बील आणून हिंदुंना जागा नाकारणाऱ्या या लोकांवर काही कारवाई होणार आहे का. मी मराठी माणूस म्हणत नाही मी हिंदू म्हणतोय. मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या ठिकाणी जागा नाकारतायेत आणि हे जागा नाकारणारे मुस्लिम नाहीत. हे भाजपचे लोक आहेत जे मंत्रिमंडळात आहेत.वक्फ प्रमाणे एखादे बील राज्य किंवा केंद्रात आणणार असतील तर आम्ही त्यांना पाठींबा देऊ हिंदुत्वाचा विषय म्हणून, असे देखील संजय राऊत म्हणाले.

आमची भूमिका ठरली...

संजय राऊत म्हणाले, शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. प्रोग्रेसिव्ह हिंदुत्व मानणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे बागलबच्चे वक्फ बोर्डाच्या निमित्ताने जी बाग देतात तो मूर्खपणा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सुचनेनुसार आमची रात्री बैठक झाली. आमची भूमिका ठरली आहे. ती शेवटच्या क्षणी तुम्हाला सभागृहात दिसेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT