Uddhav Thackeray BJP Clash : उद्धव ठाकरेंना भाजपने खिंडीत गाठले! वक्फवरून केली पुन्हा कोंडी ?

BJP vs Uddhav Thackeray News : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गट हिंदुत्वाकडे झुकलेला दिसत आहे. त्यामुळे त्यांचे खासदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी संसदेत मांडले जाणार असून उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याबद्दल कुतूहल आहे. वक्फ विधेयकाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेही यांची कोंडी करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.

वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. त्यातच बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

वक्फ विधेयकावरून देशभरात गदारोळ माजला होता. गेल्या वर्षी हे विधेयक संसदेत सादर झाले होते. त्यानंतर ते दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले. समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने मूळ विधेयकात काही बदलांना मंजुरी दिली.

मात्र संसदेत जेव्हा हे विधेयक सादर झाले होते तेव्हा शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार गैरहजर होते. यामुळे ठाकरे गटावर जोरदार टीका झाली होती. त्यातच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे गट हिंदुत्वाकडे झुकलेला दिसत आहे. त्यामुळे त्यांचे खासदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Waqf Amendment Bill : 'वक्फ' विधेयकावर सरकारची अग्निपरीक्षा? भाजपकडे नाही बहुमत; काय आहे लोकभेतील 'नंबर गेम'?

बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावर आठ तास चर्चा अपेक्षित आहे. लोकसभेतील रालोआचे संख्याबळ पाहता ते सहज मंजूर होईल, असे वाटते. दुसरीकडे भाजपने (Bjp) आपल्या सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबत राहणार की विरोधात राहणार याची उत्सुकता आहे. त्यातच वक्फ विधेयकाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेही यांची कोंडी करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder : अखेर सुदर्शन घुले फुटला; जबाबात प्रतिक घुलेपासून सगळ्यांचे कारनामे सांगितले!

वक्फ सुधारणा विधेयक मांडले जात असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार ? याबद्दल कुतूहल आहे. वक्फ विधेयकाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे.

एकीकडे वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडले जात असतानाच बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे सर्वांचेच उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Dhananjay Munde : अजित पवार बीडमध्ये पण धनंजय मुंडे कुठे? बैठकीला राहणार अनुपस्थित

वक्फच्या विधेयकावरून देशभरात गदारोळ माजला आहे. गेल्याच वर्षी हे विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते. परंतु दोन्ही सभागृहाने हे विधयेक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे विधयेक संयुक्त समितीकडे सादर केल्यानंतर केंद्रीय मंत्री मंडळांने मूळ विधेयकात काही बदलांना मंजुरी दिली. मात्र, संसदेत विधेयक सादर झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे खासदार गैरहजर राहिले होते. त्यामुळे जोरदार टीका झाली होती.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
Congress vs BJP : मोदींच्या निवृत्तीवर काँग्रेसच्या सपकाळांनी भाजपला दिला रामायणाचा दाखला; म्हणाले, 'दशरथाला दाढीत पांढरा केस दिसला अन्...'

या प्रकारानंतर मातोश्रीबाहेर काही जणांनी निदर्शने केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा याच मुद्दयावरून कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. या विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुधारणा करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार? याची उत्सुकता आहे.

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
BJP-RSS : लोकसभेचा दणका जिव्हारी; भाजप अन् PM मोदींनी संघाशी पुन्हा जुळवून घेतले?

वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने मतदान ठाकरेंच्या शिवसेनेला केले होते. त्यासोबतच येत्या काळात आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

त्यामुळे आता एका बाजूला हिंदुत्ववादी भूमिका आणि दुसऱ्या बाजूला वक्फ सुधारणा विधेयक, अशा कोंडीत शिवसेना ठाकरे गट अडकला आहे. त्यामुळे या वक्फ सुधारणा विधेयकाबाबत शिवसेना ठाकरे गटाची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
BJP New President : भाजपच्या गोटातून मोठी बातमी; नवा अध्यक्ष 'या' दिवशी ठरणार, महाराष्ट्रातील नेत्याचे नाव आघाडीवर ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com