Shivsena Anniversary : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात यंदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महाराष्ट्राने पीएम मोदीला चारशेपार या घोषणेपासून दूर ठेवले. विशेषतः महाराष्ट्र, उत्तरप्रदेश या दोन राज्याने बहुमतापासून भाजपला दूर ठेवले. निवडणुकीत पराभव होऊनही राज्यात गद्दारीचा स्ट्राइक रेट वाढला आहे. या विजयाचे नेतृत्व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. आमच्या शिवसेनेला 58 वर्षे पूर्ण झाली तर त्यांना अडीच वर्ष पूर्ण झाले असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या (Shivsena) 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह नेतेमंडळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
शिंदे यांच्या शिवसेनेवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शेलक्या शब्दांत टीका केली. डोमकावळ्यांचा मेळावा तिकडे होत असल्याचे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेवर राऊत स्टाईल हल्लाबोल केला. तर, नेहमीप्रमाणे भाजपला लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही यावेळी लक्ष्य केले.
आजचा दिवस शिवसेनेसाठी ऐताहासिक आहे. फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या फडतूस माणसांसमोर आम्ही झुकणार नाही, असे म्हणत भाजपला लक्ष्य केले.
महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात यंदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महाराष्ट्राने पीएम मोदीला चारशेपार या घोषणेपासून दूर ठेवले. असंख्य हुतात्माच्या बलिदानतून शिवसेना स्थापन केली, आता हे गुजरातचे सोमे गोमे आले आहेत. महाराष्ट्राचा वारसा उद्धव ठाकरे यांनी चालवला आणि लोकसभेत यश मिळवले असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या पराभवावरुन राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजप आता आभार यात्रा धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशाबद्दल पराभवाबद्दल आभार मानणार आहात काय 400 पार करणार होते. मात्र पराभव झाल्यानंतर आणि आभार यात्रा काय काढताय, अशा शब्दांत राऊतांनी सुनावले.