Shivsena 58th Anniversary : 19 जून 1966...; मराठी माणसाची करारी शिवसेना आता झाली 58 वर्षांची!

Shivsena Foundation Day 2024 : रस्त्यावर उतरून दोन हात करण्याचा बाळासाहेबांचा करारी बाणा आणि त्यांचा करिष्मा आधी मुंबईकरांवर आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेवर जादू करून गेला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारत महापालिका ताब्यात घेतली.
Shivsena Bhavan
Shivsena Bhavan Sarkaranma

Shivsena Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणात 58 वर्षांपासून शिवसेना नावाचे वादळ नेहमीच घोंगावत राहिले. 19 जून 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण असो, वसंतराव नाईक असो, शंकरराव चव्हाण असो वा शरद पवार कुणीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला तरी मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कुणाचीही तमा बाळगली नाही.

रस्त्यावर उतरून दोन हात करण्याचा बाळासाहेबांचा करारी बाणा आणि त्यांचा करिश्मा आधी मुंबईकरांवर आणि त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेवर जादू करून गेला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) मुसंडी मारत महापालिका ताब्यात घेतली. त्या माध्यमातून पहिल्यांदा मराठी माणसांसाठी बाळासाहेबांनी सत्तेची दारे उघडली. (Shivsena Foundation Day 2024 News)

राजकारण आणि समाजकारणाची पन्नाशी ओलांडलेल्या शिवसेनेने राजकीय वाटचालीत अनेक आंदोलने केली आणि अनेक आंदोलने पाहिली. भाजप-शिवसेना युती 25 वर्षे टिकली, तरी नंतरच्या काळात दुरावा आणि दुस्वास दोन्हीही वाढत गेल्याने सत्तेत एकत्र आले तरी कुरघोडी कायमच राहिली आहे.

1966 ते 2002 पर्यंत बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. सत्तेत असो वा नसो महाराष्ट्राच्या मध्यवर्ती राजकारणातून बाळासाहेबांना बाजूला ठेवून राजकारण करणे काॅंग्रेससह कोणत्याही विरोधकांना धडकी भरविणारे असेच होते.

शिवसेनेने अनेक आंदोलने करून मराठी माणसाला न्याय मिळवून दिला. 19 जून 1966 रोजी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी गरज ओळखून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरू झाला मराठी माणसाचे नाही हक्काचा लढा. शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेली अनेक आंदोलने धडकी भरवणारी होती. या आंदोलनामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणसाला न्याय मिळाला. त्यामुळे शिवसेनेचे आंदोलने आजही कोणी विसरू शकत नाही.

Shivsena Bhavan
Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमधून खोपडे की मेघेंची वर्णी लागणार ?

शिवसेनेच्या जडणघडणीतील ही आहेत महत्त्वाची टप्पे :

23 जानेवारी 1926 - बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म. प्रबोधनकार केशवराव ठाकरे यांचा वारसा चालवला. व्यंग्यचित्रकार म्हणून ख्यातनाम. "फ्री प्रेस जर्नल'मध्ये नोकरी. संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा देणाऱ्या व्यंग्यचित्रावरून मतभेद झाल्याने 1959 मध्ये "फ्री प्रेस'ला निरोप.

13 ऑगस्ट 1960 - मराठीतील पहिले व्यंग्यचित्र साप्ताहिक "मार्मिक'ची स्थापना. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पहिल्या अंकाचे प्रकाशन.

19 जून 1966 - शिवाजी पार्कवरील छोटेखानी घरात प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची स्थापना. त्यानंतर नोंदणीसाठी मराठी माणसांची झुंबड.

30 ऑक्‍टोबर 1966 - प्रबोधनकारांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा. तुफानी गर्दी. प्रबोधनकार - "हा बाळ मी आज तुम्हांला दिला.' बाळासाहेबांचे सूत्र - "राजकारण हे गजकरण. त्यामुळे 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण'

1967 - ठाणे पालिकेची निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार. जॉर्ज फर्नांडिस, कॉम्रेड श्रीपाद डांगे अशा समाजवादी, साम्यवादी उमेदवारांना जाहीर विरोध.

1968 - प्रजा समाजवादी पक्षाबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवून 120 पैकी 42 जागा जिंकल्या. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा स्थापन.

Shivsena Bhavan
Shiv Sena Foundation Day : शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा उजवे!

1969 - तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी माहीम कॉजवेवर अडवण्याच्या प्रयत्नानंतर मुंबईत भीषण दंगल. मुंबई सात दिवस जळत राहिली. बाळासाहेब ठाकरेंना पहिल्यांदाच अटक, येरवडा तुरुंगात रवानगी. दंगलीत 69 ठार. ठाकरेंनी तुरुंगातून काढलेल्या निवेदनानंतर मुंबई शांत.

5 जून 1970 - कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाईंची हत्या. संशयति शिवसैनिकांना अटक. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक यांचा विजय, शिवसेनेचे पहिले आमदार.

1971 - डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर.

1972 - विधानसभा निवडणुकीत प्रमोद नवलकर विजयी.

1974 - थेट पद्धतीने नगराध्यक्ष निवडणुकीत ठाण्यातून शिवसेनेचे सतीश प्रधान विजयी.

1975 - पंतप्रधान इंदिरा गांधींनी जारी केलेल्या आणीबाणीस पाठिंबा.

1978 - विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव. शिवाजी पार्कवरील सभेत बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुखपदाच्या राजीनाम्याची घोषणा. प्रचंड गदारोळानंतर राजीनामा मागे.

1980 - कॉंग्रेसचा विधानसभा निवडणुकीत थेट प्रचार. त्याबदल्यात विधान परिषदेच्या दोन जागा.

1984 - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाबरोबर युती. इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या सहानुभूती लाटेत मुंबईतील सर्व उमेदवार पराभूत.

1985 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करण्याचा डाव'! या तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या उद्‌गारानंतर चित्रच पालटले. शिवसेना मुंबई महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष, छगन भुजबळ महापौर. शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या नेतृत्वाखालील "पुलोद'मध्ये भाजप सामील झाल्याने "कमळाबाई आम्हांला सोडून गेल्या' असे बाळासाहेबांचे उद्‌गार. मुंबईतून भुजबळ एकमेव आमदार.

1985 - महाडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात "आता घोडदौड महाराष्ट्रात' अशी घोषणा. मुंबई-ठाणे या पट्ट्याबाहेर उर्वरित महाराष्ट्रात विस्ताराचा निर्धार.

Shivsena Bhavan
Nanded Lok Sabha Constituency : लोकसभा पराभवाचे साईड इफेक्ट ; भाजपचे पदाधिकारी हमरीतुमरीवर...

1987 - हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न. "गर्व से कहो हम हिंदू है' अशी घोषणा. मुंबईचे तत्कालीन महापौर डॉ. रमेश प्रभू विजयी. भाजप तेव्हा जनता दलाबरोबर शिवसेनेच्या विरोधात.

1989 - लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेशी युतीसाठी भाजप (Bjp) नेते प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नांना यश. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चार उमेदवार प्रथमच विजयी. त्यानंतर अनेक वादविवाद, वादळे पचवत 2014 पर्यंत शिवसेना-भाजप युती कायम.

1990 - बाळासाहेब ठाकरे यांचे "एकच लक्ष्य - विधानसभा' अशी घोषणा करून महाराष्ट्रभर झंझावती दौरे, प्रचार. शिवसेना-भाजप युतीची सत्ता येईल असे वातावरण असताना निराशा पदरी. तरीही 52 उमेदवार विजयी. मनोहर जोशी विरोधी पक्षनेते.

1991 - अखेरचा "जय महाराष्ट्र' ठोकत छगन भुजबळ यांच्यासह 12 आमदार शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल. युती असतानाही भाजपने विरोधी पक्षनेतेपदी दावा केला, गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते.

1992 - मुंबई महापालिकेतील सत्ता गमावली, कॉंग्रेसची सरशी.

6 डिसेंबर 1992 - आयोध्येतील बाबरी मशिद जमीनदोस्त. ती शिवसैनिकांनी पाडल्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली. पाठोपाठ डिसेंबर 1992 आणि जानेवारी 1993 मध्ये मुंबई भीषण दंगलींनी हादरली. दंगलीत शिवसेनेचा सहभाग असल्याचा न्या. श्रीकृष्ण आयोगाचा ठपका.

1995 - स्थापनेनंतर 29 वर्षांनी महाराष्ट्राची सत्ता शिवसेनेने भाजपच्या मदतीने पटकावली. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडेंनी स्वीकारली. माझगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांचा बाळा नांदगावकरांकडून पराभव.

1996 - कॉंग्रेसमध्ये फूट पाडून शिवसेनेचे मिलिंद वैद्य मुंबईचे महापौर.

1997 - मुंबई महापालिकेच्या चाव्या पुन्हा शिवसेनेकडे.

1998 - लोकसभा निवडणुकीत प्रथमच भाजपच्या नेतृत्वाखालील "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे (एनडीए) देशात सरकार. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार 13 दिवसांतच पायउतार. प्रथमच शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री.

1999 - मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्याऐवजी नारायण राणे मुख्यमंत्री.

Shivsena Bhavan
Nanded Lok Sabha Constituency : लोकसभा पराभवाचे साईड इफेक्ट ; भाजपचे पदाधिकारी हमरीतुमरीवर...

1999 - प्रमोद महाजन यांच्या आग्रहाखातर सहा महिने आधी विधासभेची निवडणूक, राज्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता. नारायण राणे विरोधी पक्षनेते. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मनोहर जोशी केंद्रीय मंत्री.

2002 - लोकसभेच्या सभापतिपदी मनोहर जोशी. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता कायम.

2003 - महाबळेश्‍वरमधील अधिवेशनात राज ठाकरे यांनी सुचवल्यानुसार उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख.

2004 - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पुन्हा सत्तेची हुलकावणी.

2005 - नारायण राणे (Narayan Rane) यांची शिवसेनेतून हकालपट्टी.

27 नोव्हेंबर 2005 - संघटनेतील कोंडींनंतर राज ठाकरे यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा.

Shivsena Bhavan
Shiv Sena Foundation Day 2024 : जय महाराष्ट्र, भगवा, वाघ, धनुष्यबाण...हेच जीव की प्राण!

18 डिसेंबर 2005 - "माझा विठ्ठलाला विरोध नाही, विरोध आहे तो विठ्ठलाभोवतीच्या बडव्यांना', असे विधान करत राज ठाकरे यांचा शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र'. बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे यांच्यासमवेत राज यांचा महाराष्ट्रभर दौरा.

9 मार्च 2006 - राज ठाकरेंकडून "महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ची स्थापना. पक्षाच्या झेंड्याचे अनावरण. 19 मार्च 2006 रोजी शिवाजी पार्कवर विराट जाहीर सभा.

2007 - "मनसे'ने मोठे आव्हान उभे करूनही मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा.

2009 - विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीला सत्तेची हुलकावणी.

2012 - मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे शिवसेनेसमोर कडवे आव्हान, तरीही चाव्या पुन्हा शिवसेनेच पटकावल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब.

16 जुलै 2012 - उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आँजिओग्राफी. राज ठाकरे रुग्णालयात दाखल. सहा वर्षांनी दोन भाऊ एकत्र आल्याने चर्चेला उधाण.

24 जुलै 2012 - बाळासाहेब ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल.

नोव्हेंबर 2012 - बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर. ऐन दिवाळीत शिवसैनिक शोकाकुल.

17 नोव्हेंबर 2012 - बाळासाहेब ठाकरेंचा अखेरचा "जय महाराष्ट्र'.

Shivsena Bhavan
VIDEO - BJP Maharshtra Delhi Meeting: भाजपने विधानसभेसाठी कसली कंबर; दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत 'रोडमॅप'वर चर्चा!

2014 - भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी केंद्रात सत्तेवर, शिवसेनेने लोकसभेच्या 18 जागा पटकावल्या. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर. शिवसेनेचा खासदार मंत्री.

25 सप्टेंबर 2014 - शिवसेना आणि भाजप यांची 25 वर्षांची युती विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून फिस्कटली.

ऑक्‍टोबर 2014 - शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्ररीत्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली. आधीच्या विधानसभेत 46 जागा असलेल्या भाजपने 122; तर शिवसेनेने 45 वरून 63 जागांवर मांड असल्याचे सिद्ध केले. कॉंग्रेसचे संख्याबळ घटून 82 वरून 42 वर आले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ 62 वरून 41 वर आले. भाजप सत्तेवर आली, पण शिवसेना सत्तेपासून दूर राहिली.

6 डिसेंबर 2014 - दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर, वाटाघाटीनंतर आणि मानापमानाच्या नाट्यानंतर शिवसेना भाजपबरोबर राज्यात सत्तेत सामील.

28 नोव्हेंबर 2019 : भाजपसोबत फारकत घेत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन. उद्धव ठाकरे झाले मुख्यमंत्री. आदित्य ठाकरे झाले कॅबिनेट मंत्री.

22 जून 2022- उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे 40 आमदारांसह बाहेर पडले. शिवसेनेतील फूट ही कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी ठरली आहे.

28 जून 2022 - राज्य सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

30 जून 2022- भाजपसोबत हातमिळवणी करीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath shinde) मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

4 जून 2024- लोकसभा निवडणूक दोन्ही गटाने वेगवेगळ्या लढल्या यामध्ये उद्धव ठाकरेंनी 9 जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे गटाने 7 जागी विजय मिळवला.

Shivsena Bhavan
Shivsena News : विधानसभेसाठी ठाकरेंच्या सेनेची साताऱ्यात चाचपणी; भास्कर जाधवांवर विशेष जबाबदारी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com