Sanjay Raut On Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut On Nana Patole : नानांसाठी हे 'डायमेजिंग'; संजय राऊत, असं का म्हणाले?

Shiv Sena Sanjay Raut reaction to the nomination of Nana Patole for the post of Chief Minister : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर करा, असे नागपूर काँग्रेस बैठकीतील कार्यकर्त्यांच्या मागणीवर शिवसेनेचे संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेसचे नाना पटोले यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा, अशी नागपूरमधील आमदार, पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरलीय.

तसंच नागपूर इथं झालेल्या मेळाव्यात देखील मुख्यमंत्रीपदाबाबत नाना पटोले यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर पहिली प्रतिक्रिया देत नाना पटोले यांच्यासाठी हे धोक्याचं आहे, असं म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी सकाळी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यात नागपूरमधील काँग्रेसच्या (Congress) मेळाव्यात नाना पटोले यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्रीपदाबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच आमदार विकास ठाकरे आणि प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नाना पटोले यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद खेचून आणून, असं विधान करण्यात आलं. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत नाना पटोले यांच्यासाठी हे 'डायमेजिंग' आहे, असं म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले, "काँग्रेस पक्षात, अशी भूमिका असेल, तर त्यांचे हायकमांड आहेत. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे निर्णय घेतील. काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपद हिसकावून घेण्याची भाषा करत असतील, तर ते नाना पटोलेंसाठी 'डायमेजिंक' ठरेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भूमिका स्पष्ट आहे की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा. काँग्रेस पक्ष चेहरा देणार असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करू".

नाना पटोले संयमी नेते

"'मविआ'मधील शिवसेना, राष्ट्रवादी, असे म्हणत नाही की, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, तर ते हिसकावून घेऊ. एखाद्या नेत्याच्या संदर्भात, असे वक्तव्य केले जात असेल, तर त्या नेत्याला, अशी वक्तव्य अडचणी ठरू शकतात. नाना पटोले संयमी आणि निस्वार्थी काँग्रेस नेते आहेत. काँग्रेससाठी परिश्रम करत आहेत", असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यातील निकालाबाबत कल्पना

महाविकास आघाडीत कोणतेही सर्व्हे झालेले नाहीत. त्यामुळे सर्व्हेंच्या बाबतच्या बातम्या पेरल्या जात आहेत. त्याकडे जास्त लक्ष देवू नका. पण महाराष्ट्रात सत्ताबदल होत आहे, हे देखील निश्चित आहे. परिवर्तनास सुरवात झाली आहे. राज्यात कोणत्या भागात काय निकाल लागेल, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि माहिती देखील आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT